तुळजापूर येथील नवोदय विद्यालयास जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओबासे यांची भेट

तुळजापूर येथील नवोदय विद्यालयास  जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओबासे   यांची भेट

------------------------------------------------------------------------------------
प्रतिनिधी ,प्रा.हरी जाधव. सर,
------------------------------------------------------------------------------------
तुळजापूर (दै .पंढरी नगरी न्यूज): जवाहर नवोदय विद्यालयास उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओबासे व  सी. ओ. राहुल गुप्ता यांनी शनिवार दिनांक १२/११/२०२२ रोजी भेट दिली .यावेळी त्यांनी विद्यालय परिसर , जल व्यवस्था वर्ग खोल्या, संगणक शिक्षण प्रणाली,मुलींची राहण्याची व्यवस्था, भोजनालय यांना भेट दिली. यावेळी संपूर्ण व्यवस्था पाहून  आनंद व्यक्त केला.

याप्रसंगी दहावीच्या विद्यार्थ्यांना करिअर गायडन्स संदर्भात मार्गदर्शन करताना म्हणाले की, तुम्ही अगोदर आपला पर्याय निवडा ध्येय ठरवा. सर्वात जास्त आय. आय. टी .ची निवड करा. यामध्ये भविष्यात तुम्हाला खूप मोठ्या संधी आहेत. यासाठी तुम्ही भरपूर अभ्यास करा .त्यासाठी कुठेही शिकवणी लावण्याची गरज नाही. नवोदय मध्ये मिळत असलेले शिक्षण सर्वोत्कृष्ट आहे त्याचा फक्त तुम्ही सखोल व मनापासून अभ्यास करा.

याप्रसंगी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेच्या संदर्भात काही प्रश्न विचारले. त्यावेळी त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे देऊन म्हणाले की, तुम्ही अगोदर पदवीधर व्हा !नंतर तुम्ही याही परीक्षा देऊ शकता. या परीक्षेसाठी थोडासा जास्त वेळ द्यावा लागतो. या परीक्षा मृगजळासारखे आहेत असेही त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना तुमच्या काही समस्या शिक्षणाच्या  संदर्भात असतील तर सांगा त्या मी सोडवू शकतोअसे ते म्हणाले. त्यावेळी विद्यार्थी म्हणाले की शिक्षणाच्या संदर्भात आमची कोणतीही समस्या नाही . यावेळी जवाहर नवोदय विद्यालय, खैरतल राजस्थान  वर्ग :नववी विद्यार्थ्यांशी त्यांनी सुसंवाद साधला. विद्यालयातील उपक्रम व परिसर पाहून त्यांनी अतिशय आनंद व्यक्त केला .

यावेळी विद्यालयाचे उपपाचार्य श्री .एस.व्ही.स्वामी सर यांनी विद्यालयाचा विकासाचा आलेख जिल्हाधिकाऱ्यांच्या  समोर ठेवून विद्यालयासाठी हॉल व डिजिटल क्लासरूम देण्याची विनंती केली. जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे म्हणाले, तुमची मागणी पूर्ण केली जाईल.