भालेवाडी जि .प .प्रा.शाळेत विद्यार्थ्यांना चांद्रयान 3 क्षेपणास्त्र चाचणी प्रदर्शनचे आयोजन विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

भालेवाडी जि .प .प्रा.शाळेत विद्यार्थ्यांना चांद्रयान 3 क्षेपणास्त्र चाचणी प्रदर्शनचे आयोजन विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

---------------------------------------------------------------------------------

मंगळवेढा (पंढरी नगरी न्यूज ) मंगळवेढा तालुक्यातील भालेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत भालेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने चांद्रयान 3  क्षेपणास्त्र चाचणी लाईव्ह दाखवण्यात आली व चाचणी यशस्वी झाल्यानंतर सर्व विद्यार्थी शिक्षक व ग्रामस्थ यांनी जल्लोष साजरा केला. क्षेपणास्त्र यशस्वी झाल्यानंतर भालेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक  शाळेचे मुख्याध्यापक  डोके गुरुजी व  बाजीराव गवळी गुरुजी यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. यानंतर सरपंच  डॉ. श्रीकांत  दवले यांनी सरपंचसाठी शासनाकडून मिळणाऱ्या सरपंच मानधनातून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.

या कार्यक्रम साठी सरपंच डॉ.श्रीकांत दवले ,ग्रामसेवक गायकवाड भाऊसाहेब, तलाठी भाऊसाहेब , मंगळवेढा येथील एस. टी. महामंडळ कर्मचारी वाहक गणेश गवळी ,रामचंद्र घाडगे, सुशिल गवळी, महिपती वाघमारे, विविध संस्थेचे पदाधिकारी , अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका ,ग्रामस्थ व शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.