दामाजी कारखाना सभासदांना रक्कम वसुलीसाठी एकरकमी परतफेड योजना(ओ टी एस) राबविणार : चेअरमन - श्री शिवानंद पाटील
------------------------------------------------------------------------------------
मंगळवेढा( दै.पंढरी नगरी न्यूज ) : श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील सभासद, शेतकरी, ऊस तोड वाहतुक ठेकेदार, इतर ठेकेदार यांचेकडे बऱ्याच वर्षापासून येणे असलेल्या रकमा वसुलीसाठी होणाऱ्या व्याजात ५०% सुट देवून एकरकमी परतफेड योजना (ओ टी एस ) राबविणेचे धोरण ठरले आहे,तरी या सुवर्ण संधीचा संबधीतांनी लाभ घेवून आपली रक्कम कारखान्याकडे जमा करुन येणे बाकी नसलेचा दाखला घेवून जावे असे आवाहन चेअरमन शिवानंद पाटील यांनी केले आहे.
यामध्ये ऊस तोडणी वाहतूक अँडव्हान्स, बेसळ डोस, ऊस बिलापोटी अँडव्हान्स, खत येणे रक्कम, उधार बेणे रक्कम, वहानावरील अँडव्हान्स व इतर सर्व प्रकारच्या रकमा संबंधीतांकडून कारखान्यास येणे आहेत सदरच्या रकमा भरणेबाबत कारखान्याचे प्रतिनिधीनी समक्ष भेटून तोंडी सुचना दिलेल्या आहेत तसेच वेळोवेळी नोटीसा पाठविलेल्या आहेत परंतु संबंधीतांकडुन रक्कमा येणे बाकी दिसत आहे, अशा येणेधारकांनी आपली रक्कम दि ३१ मार्च, २०२३ पूर्वी कारखान्याकडे एकरकमी भरणा केल्यास संबंधीतांना व्याजामध्ये ५०% सुट देण्यात येणार असलेचे धोरण मा ,संचालक मंडळ सभेत ठरले असलेची माहिती कार्यकारी संचालक सुनिल दळवी यांनी दिली, विद्यमान संचालक मंडळाने अनेक अडचणीतून मार्ग काढून चालू वर्षीचा गळीत हंगाम वेळेवर सुरु केलेला आहे.
सर्व सभासद- शेतकरी, ऊस तोडणी वाहतुक ठेकेदार, अधिकारी, कर्मचारी यांच्या योगदानामुळे चालू गळीत हंगाम गाळपाच्या उद्षि्ठपूर्तीकडे यशस्वीपणे वाटचाल करीत आहे. गळीत हंगाम शेवटच्या टप्प्यात आलेला असून कार्यक्षेत्रातील सर्व सभासद- शेतक-यांच्या संपूर्ण ऊसाचे गाळप झाल्याशिवाय गळीत हंगाम बंद होणार नसलेचे चेअरमन शिवानंद पाटील व व्हाईस चेअरमन तानाजी खरात यांनी सांगीतले.
सदर प्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन तानाजी खरात, संचालक पी बी पाटील, औदुंबर वाडदेकर, राजेंद्र चरणु पाटील, भारत बेदरे, बसवराज पाटील, गौरीशंकर बुरकुल, मुरलीधर दत्तू, भिवा दोलतडे, महादेव लुगडे, गोपाळ भगरे, दयानंद सोनगे, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, रेवणसिध्द् लिगाडे, अशोक केदार, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर यांचेसह कारखान्याचे सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख उपस्थित होते.