संत. दामाजी सहकारी साखर कारखाना जिल्ह्यातील इतर कारखान्याबरोबर दर देणार - चेअरमन शिवानंद पाटील

संत. दामाजी सहकारी साखर कारखाना जिल्ह्यातील इतर कारखान्याबरोबर दर देणार - चेअरमन शिवानंद पाटील

---------------------------------------------------------------------------------

मंगळवेढा (पंढरी नगरी न्यूज ) ः- साखर कारखानदारीमध्ये बायलर अग्निप्रदिपन समारंभ म्हणजे एक सण असतो, कारखानदारीतील नविन वर्षाची, नविन हंगामाची सुरुवात असते असे प्रतिपादन ह.भ. प.डाँ जयवंत बोधले महाराज यांनी केले. बायलर अग्निप्रदिपन समारंभानिमीत्त संचालक  गौरीशंकर बुरकूल व त्यांच्या सुविद्य पत्नी शितल गौरीशंकर बुरकूल या उभयतांचे शुभहस्ते श्री .सत्यनारायण पुजा व होमहवन करण्यात आले.

संत दामाजी साखर कारखान्याच्या सन २०२३-२४ सालच्या ३१ व्या बायलर अग्निप्रदिपन समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थितांना संबोधित करताना बोधले महाराज पुढे म्हणाले कि, दामाजी कारखान्याला व मंगळवेढा तालुक्याला अध्यात्माचा स्पर्श झालेला आहे सहकार, समाज, समन्वय, सात्वीक, संस्कार हे शब्द जपणे अत्यंत महत्वाचे आहे .माणसाच्या भावना आणि हेतू हे चांगले असावे  मन हे आतल्या गाठीचे नसावे माणुस हा सुखाच्या शोधात आहेमाणसाची भावना आणि हेतु चांगला असला पाहिजे ईश्वराने प्रत्येकाला कामे वाटुन दिलेली आहेत. त्याप्रमाणे प्रत्येकजण आपआपले कार्य करित असतो माणसांची हव्यास आणि इच्छा संपत नसते. परंतु समाधान शोधताना वृत्ती ही स्थिर असावी लागते. चोखोबा सारखे संत या मंगळवेढा भूमीत जन्मले व जगले म्हणूनच मंगळवेढा हे गांव सर्वश्रेष्ठ आहे. या संचालक मंडळाने आजपर्यंत चांगला कारभार केलेला आहे येथून पुढेही हे संचालक मंडळ असाच कारभार करुन येणारा गळीत हंगाम यशस्वी करतील असे बोलून त्यांनी शुभेच्छा दिल्या.

कारखान्याचे चेअरमन . शिवानंद पाटील मनोगत व्यक्त करताना म्हणाले, तालुक्यातील जेष्ठ मंडळी व मार्गदर्शक यांनी विश्वास टाकून आमच्या संचालक मंडळाला निवडून देण्यास महत्वाची भूमिका बजावली आहे. माजी आमदार प्रशांत परिचारक, विठ्ठल कारखान्याचे माजी चेअरमन भगिरथ भालके यांच्या सहकार्याने आम्ही काम करीत आहोत .संस्थापक चेअरमन स्व.मारवाडी वकिलसाहेब व संस्थापक व्हा.चेअरमन स्व .रतनचंद शहा शेठजी यांच्याप्रमाणेच आमचे संचालक मंडळानेही सर्वांच्या विश्वासास जागून एकदिलाने काटकसरीने पारदर्शी असा कारभार केलेला आहे. गेल्या गळीत हंगामामध्ये एफ.आर.पी पेक्षा जादा दर शेतक-यांना दिलेला आहे. मागील हंगामाचे ऊस बिल, तोडणी वाहतूक बिल, पूर्णपणे अदा केलेले आहे कामगारांचे पगारही दरमहिन्याला वेळेवर करीत आहोत .येणारा हंगाम हा आव्हानात्मक असून या गळीत हंगामामध्ये ४ लाख मे.टनाचे उद्षि्ठ ठेवलेले आहे. गाळप हंगामासाठी परिपुर्ण अशी सर्व तोडणी वाहतुक यंत्रणा भरली आहे.या हंगामात जास्तीत जास्त गळीत करुन इतर कारखान्याच्या बरोबरीने चांगला दर देण्यास हे संचालक मंडळ कटिबध्द् आहे. यावर्षीचा ऊसाचा दर शेजारील कारखान्यापेक्षा कमी रहाणार नाही .तरी येणाऱ्या हंगामाकरिता आपला ऊस दामाजी कारखान्याचे गळीतासाठी पाठवुन कारखान्याचे प्रगतीसाठी सहकार्य करावे असे आवाहन शिवानंद पाटील यांनी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्षपदावरुन बोलताना धनश्री परिवाराचे शिवाजीराव काळुंगे म्हणाले, यावर्षी पाऊस कमी झाल्याने ऊसाचा उतारा व टनेज कमी रहणार आहे. या गळीत हंगामामध्ये कारखान्यांमध्ये ऊसाच्या बाबतीत स्पर्धा रहाणार आहे. सर्व ऊस वाटून वेगवेगळया कारखान्यांना जाणार आहे. दामाजी कारखान्याला दरवर्षी ऊसाचा सरासरी उतारा हा चांगला मिळत राहिला आहे. जेवढा उतारा जास्त तेवढा जादा दर देता येणार आहे. शेतक-यांनीही नविन जातीचे व जास्त उतारा असणा-या ऊसाची लागण करणे गरजेचे आहे. गत हंगामात एफ आर पी पेक्षा जादा दर या कारखान्याने शेतक-यांना दिलेला आहे. कामगारानाही हा गळीत हंगाम आव्हानात्मक असणार आहे हे लक्षात ठेवून काम करावे लागणार आहे असे ते म्हणाले.

या कार्यक्रमास दामाजी कारखान्याचे माजी चेअरमन नंदकुमार पवार, जिजामाता पतसंस्थेचे मार्गदर्शक श्री रामकृष्ण नागणे, माजी व्हा चेअरमन  रामचंद्र वाकडे, माजी संचालक  यादाप्पा माळी , कारखान्याचे व्हाईस चेअरमन  तानाजी खरात, संचालक सर्वश्री मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणु पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिध्द लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुरुवातीला कार्यकारी संचालक  रमेश जायभाय यांनी उपस्थितांचे स्वागत करुन येणाऱ्या हंगामात संचालक मंडळाचे उद्दीष्ठाप्रमाणे गळीत करणेस कर्मचारी वर्ग कटीबध्द् असलेची ग्वाही दिली.

बायलर अग्नीप्रदिपन कार्यक्रमासाठी माजी संचालक सर्वश्री जालिंदर व्हनुटगी, भारत पाटील, कल्याण रोकडे, रामलिंग कवचाळे, काशिनाथ पाटील, इराण्णा पुजारी, रावसाहेब लिगाडे, दौलत माने, दादा पवार, संतोष मोगले, अशोक माळी, विजय बुरकूल, माणिक पवार, गुलाब थोरबोले, बंडू करे, शिवाजी घोडके, हणमंत रोकडे, तानाजी रोकडे, अशोक पवार, खुतबुद्दीन शेख, सुनिल जाधव, भागवत भुसे, प्रकाश पाटील, दत्ता गडदे, संपत गडदे, मल्लीकार्जून देशमुखे, सत्यकाम न्यूजचे श्री कुलकर्णी, कारखान्याचे खाते प्रमुख, विभागप्रमुख, कर्मचारी, सभासद- शेतकरी, तालुक्यातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी,  वाहतूक ठेकेदार, कामगार संघटना व पतसंस्थेचे पदाधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

उपस्थितांचे आभार संचालक  दिगंबर भाकरे यांनी मानले तर सुत्रसंचालन अशोक उन्हाळे यांनी केले.