संगेवाडी जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने सायकल स्वार व्यक्तीचा जागीच मृत्यू...!

संगेवाडी जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने सायकल स्वार व्यक्तीचा जागीच मृत्यू...!

---------------------------------------------------------------------------------

सांगोला प्रतिनिधी- धनंजय खंडागळे, संगेवाडी( दै पंढरी नगरी न्यूज) : पंढरपूर - सांगोला राष्ट्रीय महामार्गावरील संगेवाडी, ता.सांगोला येथील शिवनेरी हॉटेल समोर  दि.३०रोजी  पहाटे ४ च्या सुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या -जाणाऱ्या अज्ञात वाहनाने एका अज्ञात सायकल स्वार व्यक्तीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने सायकल स्वराचा जागीच मृत्यू झाला आहे.

मयत झालेला अज्ञात सायकल स्वार हा ऊसतोड कामगार असल्याचे सांगण्यात येत आहे .मयत झालेल्या व्यक्तीचे अंदाजे वय  (४५ )असून त्याचा वर्ण काळा सावळा आहे. अंगावर टी-शर्ट आणि पॅन्ट असल्याचे दिसून येत आहे हा अपघात झाल्यानंतर सकाळी संगेवाडी व परिसरातील नागरिकांनी बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती. अपघात झालेले ठिकाण संबंधित सांगोला तालुका पोलीस स्टेशन हद्दीत हा अपघात झाला असल्याने संबंधित अपघाताची खबर नागरिकांनी फोन द्वारे माहिती पोलिसांना दिली आहे.