नवोदय विद्यालयात जागतिक मातृभाषा दिवस साजरा

नवोदय विद्यालयात जागतिक मातृभाषा दिवस साजरा

------------------------------------------------------------------------------------

तुळजापूर (दै.पंढरी नगरी न्यूज ) तुळजापूर येथील जवाहर नवोदय विद्यालयात २१ फेब्रुवारी हा दिवस जागतिक मातृभाषा दिवस म्हणून साजरा करण्यात आला.

यावेळी एच. जी. जाधव यांनी हा दिवस जागतिक मातृभाषा दिवस म्हणून का साजरा केला जातो याची सविस्तर माहिती सांगितली. यानंतर मा. उदय वाघमारे यांनी मातृभाषेचे महत्त्व विशद करताना  म्हणाला  की, सर्वांनी मातृभाषेवरती प्रभुत्व मिळवून जो जास्तीत जास्त भाषा अवगत करेल तो खरा श्रीमंत असेल असे त्यांनी सांगितले.  विद्यालयाचे प्राचार्य  गंगाराम  सिंह यांनी आजच्या जागतिक मातृभाषा दिवसाचे  महत्त्व स्पष्ट करताना म्हणाले की संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी, भाषा जतन व संवर्धन करण्यासाठी, तसेच वारसा जतन करण्यासाठी, एकता निर्माण करण्यासाठी मातृभाषा अतिशय महत्त्वपूर्ण आहे हे सांगून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त भाषा शिकण्याचे आवाहन केले.

आजच्या या जागतिक मातृभाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एच.जी. जाधव यांनी केले .