बार्शीच्या कॉलेज ऑफ एज्युकेशन मध्ये विद्यापीठ वर्धापन दिन उत्साहात साजरा

बार्शीच्या कॉलेज ऑफ एज्युकेशन मध्ये विद्यापीठ वर्धापन दिन उत्साहात साजरा

------------------------------------------------------------------------------------

बाशी( दै.पंढरी नगरी न्यूज ) श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी येथे आयक्यूएसी, सांस्कृतिक विभाग,रासेयो व शौर्य कुल यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा २० वा वर्धापन दिन, लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस एस गोरे हे होते. यावेळी व्यासपीठावर आयक्यूएसी समन्वयक तथा बी एड विभाग प्रमुख डॉ. व्ही पी शिखरे, बी पी एड विभाग प्रमुख डॉ. ए जी कांबळे, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ एम एस डिसले, कार्यक्रम समन्वयक डॉ पी ए पाटील, सांस्कृतिक प्रमुख डॉ आर ए फुरडे तसेच इतर प्राध्यापक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे औचित्य साधून बी एड प्रशिक्षणार्थींनी मनोगत व्यक्त केले.यात स्नेहा आगळे, प्रतिक्षा चौधरी व हर्षदा पाडुळे यांनी अनुक्रमे लोकमान्य टिळक, अण्णा भाऊ साठे व विद्यापीठ दिन यावर आपले विचार व्यक्त केले.तसेच सीटीईटी परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ एस एस गोरे यांनी विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त विद्यापीठाच्या शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या यशस्वी कारकीर्दीचा सविस्तर आढावा घेतला. एका जिल्ह्यापुरते एकमेव असे विद्यापीठ आज राष्ट्रीय व जागतिक स्तरावर आपले नाव लौकिक वाढवीत आहे याचा सर्वांना अभिमान आहे. संशोधन क्षेत्रात विद्यापीठाने अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत. कौशल्यधिष्टीत उपक्रमावर विद्यापीठाचा भर राहिला आहे. विद्यार्थी केंद्रित विकास प्रणाली राबवून विद्यापीठ आपली वाटचाल करत आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक कार्यक्रम समन्वयक डॉ पी ए पाटील यांनी केले तर उपस्थितांचे आभार झिपा मुल्ला यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी निकम व वैशाली कांबळे यांनी केले.