माढा मतदारसंघा बरोबर पंढरपूर भागातील 42 गावातील जनतेचा विकास करणार-, नगराध्यक्ष मीनल साठे साठे कुटुंबीयांचा मतदारसंघा तील 42 गावात झंजावती दौरा..

माढा मतदारसंघा बरोबर  पंढरपूर भागातील 42 गावातील जनतेचा विकास करणार-, नगराध्यक्ष मीनल साठे   साठे कुटुंबीयांचा मतदारसंघा तील 42 गावात झंजावती दौरा..

------------------------------------------------------------------------------------

करकंब (दै.पंढरी नगरी न्यूज ) माढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा मीनल साठे यांचा पंढरपूर मतदार संघातील मतदार संपर्क गावभेटीचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. माढा मतदारसंघात समाविष्ट असणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील 42 गावातील सुरुवात नगराध्यक्षा मीनल ताई साठे यांनी नुकतीच आज पांढरेवाडी, खेडभोसे व देवडे येथील गावातील मतदाराशी संपर्क साधत त्यांनी अनेक अपूर्ण असलेल्या विषयावर नागरिकांची गाव भेटीदरम्यान चर्चा करण्यात आली.

माढा- पंढरपूर मतदार संघातील नागरिकांचा विकास करणे हेच आमचे उद्देश असल्याचे त्यांनी यावेळी नागरिकांशी बोलताना व्यक्त केली तसेच 42 गावातील वाडी वस्ती वरील रस्त्याचे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले. पंढरपूर- माढा मतदारसंघातून विधानसभेसाठी मी स्वतः उभे राहणार असून मतदार संघातील अनेक अपूर्ण राहिलेले प्रश्न मार्गी लावण्याकरिता मला विधानसभेत पाठवण्यासाठी काम करण्याची संधी देवून आशीर्वाद द्यावा ही विनंती करण्यासाठी मी तुमच्या दारापर्यंत आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी कुर्मदास सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादासाहेब साठे, व्हा.चेअरमन सुधीर पाटील, संचालक राहुल पाटील, माढा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा कल्पना जगदाळे व इतर मान्यवर यावेळी गावातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.