पंढरपूर येथे ओबीसी काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन..
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर( दै.पंढरी नगरी न्यूज ) सोलापूर जिल्हा ओबीसी काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे केंद्रीय मंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे मनोरुग्ण नेते अनुराग ठाकूर यांना जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
केंद्रीय अर्थसंकल्प चर्चेदरम्यान देशाचे नेते व विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी देशातील ओबीसी अल्पसंख्यांक दलित आणि आदिवासी अशा अनेक जातीचे लोक ते आपल्या विकासापासून वंचित आहे त्यांना न्याय देण्यासाठी देशात जातीय गणना करणे आवश्यक आहे या त्यांच्या भाषणाला उत्तर देताना मनोरुग्ण केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आमचे नेते राहुलजी गांधी यांना उद्देशून असे म्हटले की आपल्या जातीचा पत्ता नाही. आपली जात कोणती. आणि आपण जाती गणनाची भाषा करता असा प्रति प्रश्न विचारून त्यांच्यावर अभद्र टिप्पणी करण्यात आली वास्तविक पाहता हा अनुराग ठाकूर मंत्री असून मागील काही महिन्यापूर्वी नई दिल्ली येथील शाहीन बाग येथे एन. आर. सी व सी. ए. ए केंद्र सरकारच्या या विधेयका विरोधात मुस्लिम समाज व इतर जातीतील प्रख्यात नेते मंडळी धरण्यावर बसली होती.
परंतु त्याही वेळेस या केंद्रीय मंत्री ठाकूरने त्या ठिकाणी जाऊन गोली मारो इन देश के गद्दारों को असे प्रक्षोभक विधान केले होते वास्तविक पाहता भारतीय जनता पक्ष हा पूर्वीपासून धर्मांध पद्धतीचा असून देशाचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी हे सुद्धा याचे समर्थक आहे अशी ह्या लोकांची प्रवृत्ती असल्याने हे सतत देशाच्या संविधानावर हल्ला करीत असतात म्हणून अशा जातीवादी प्रवृत्ती असलेल्या केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना ताबडतोब बडतर्फ करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा म्हणून सोलापूर जिल्हा ओबीसी विभागाच्या वतीने करण्यात आली समीर कोळी माजी जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली त्यांना जोडे मारून आंदोलन करण्यात आले व त्यांचा जाहीर निषेध करण्यात आला.
यावेळी समीर कोळी काँग्रेस ओबीसी माजी जिल्हाध्यक्ष हनुमंत मोरे तालुकाध्यक्ष, सुहास भाळवणकर जिल्हा उपाध्यक्ष किशोर जाधव जिल्हा सरचिटणीस अल्पसंख्यांक शहराध्यक्ष अशपाक सय्यद, शहर उपाध्यक्ष सागर कदम, बाळासाहेब आसबे मीडिया सेल पंढरपूर मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष ,भाऊ तेलंग जेष्ठ नेते मामा फलटणकर शेखर मोरे, मनोज गावंडे, समाजसेवक शिवाजी राजे धोत्रे, शकील रत्नपारखी अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष रेहान सय्यद व सर्व काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.