ग्रामपंचायत मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज: चार टेबलवर १३ फेऱ्यात होणार मतमोजणी ,नायब तहसिलदार - पंडीत कोळी.

ग्रामपंचायत मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज: चार टेबलवर १३ फेऱ्यात होणार मतमोजणी ,नायब तहसिलदार - पंडीत कोळी.

------------------------------------------------------------------------------------
निवडून आलेल्या  उमेदवारांनी मिरवणूक काढण्यासबंदी
------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर(दै.पंढरी नगरी न्यूज) : पंढरपर तालुक्यातील एकूण दहा ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दिनांक १८ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून. मतमोजणी प्रक्रिया मंगळवार दि. २०डिसेंबर २०२२रोजी सकाळी ८. वाजता शासकीय धान्य गोदाम, पंढरपूर येथे होणार आहे. यासाठी सर्व मतमोजणी  यंत्रणा सज्ज असल्याची माहिती महसूल निवासी नायब तहसीलदार पंडित कोळी यांनी दिली.

पंढरपूर तालुक्यातील मौजे तुंगत, खेडभोसे, नेमतवाडी, बार्डी, खरातवाडी, मेंढापूर, होळे, आजोती, पुळुजवाडी, टाकळी गुरसाळे या ११ ग्रामपंचायतींची १८ डिसेंबर २०२२ रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मतमोजणी करिता ४ टेबलची रचना करण्यात आली आहे. मतमोजणीसाठी एकूण १३फेऱ्या निश्चित करण्यात आलेल्या असून, मतमोजणीसाठी  तहसीलदार, अपर तहसीलदार, निवासी नायब तहसीलदार, महसूल नायब तहसीलदार यांच्या पर्यवेक्षणाखाली ११ निवडणूक निर्णय अधिकारी, ४ मंडळ अधिकारी, ११ तलाठी, ६महसूल सहाय्यक, १५कोतवाल व शिपाई यांची नेमणूक करण्यात आली आहे.
 
मतमोजणीकरीता उमेदवार व त्यांच्या मतमोजणी प्रतिनिधी यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून ओळखपत्रे वितरित करण्यात आली असून ,ओळखपत्र असल्याशिवाय कोणालाही मतमोजणी कक्षात प्रवेश देण्यात येणार नाही. मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस विभागाकडून आवश्यक तो बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. सर्व उमेदवार प्रतिनिधी यांनी मतमोजणी प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनात सहकार्य करावे असे, आवाहनही तहसीलदार कार्यालयाकडून केले आहे.