Pune Crime News : पुण्यात दोन पिस्टल व काडतुसासह दोघांना अटक
एमपीसी न्यूज - कोंढवा पोलिसांनी दोघांना दोन पिस्टल व जिवंत काडतुसांसह अटक केली आहे. ही कारवाई पोलिसांनी कोंढव्यातील टिळेकरनगर व सासवड येथे केली आहे.
सचिन संभाजी जाधव (वय 31 रा.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बातमीदारामार्फत पोलिसांना खबर मिळाली की,टिळेकरनगर येथे पाण्याच्या टाकीजवळ एक जण कमरेला पिस्टल अडकवून संशयास्पदरित्या कोणाची तरी वाट बघत फिरत आहे.पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सचिन याला ताब्यात घेतले. सचिनकडून पोलिसांनी एक पिस्टल व 5 जिवंत राऊंड जप्त केले.चौकशी केली असता त्याच्याकडे शस्त्रपरवाना नसल्याचे त्याने सांगितले.
पोलीस तपासात त्याने त्याचा मित्र सागर याच्याकडेही शस्त्र असल्याचे सांगितले.त्यानुसार पोलिसांनी सासवड येथे जात सागरला ही ताब्यात घेतले. सागरकडे एक पिस्टल व दोन जिवंत राऊंड मिळाले. अशाप्रकारे 80 हजार रुपयांच्या दोन पिस्टल 1 हजार 200 रुपयाचे सात जिवंत राऊंड असा एकूण 81 हजार 200 रुपयांचा ऐवज जप्त केला.यानुसार कोंढवा पोलीस ठाण्यात आर्म अक्ट नुसार दोघांवर गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.