सहकार शिरोमणी कारखाना कार्यस्थळावर 75 वा अमृतमहोत्सवी स्वातंत्र दिन उत्साहात साजरा

सहकार शिरोमणी कारखाना कार्यस्थळावर 75 वा अमृतमहोत्सवी स्वातंत्र दिन उत्साहात साजरा

सहकार शिरोमणी कारखाना कार्यस्थळावर 75 वा अमृतमहोत्सवी स्वातंत्र दिन उत्साहात साजरा

भाळवणी दि.15 :-  सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर 75 वा अमृत महोत्सवी वर्ष उत्साहात साजरा करण्यात आले. शनिवार दि.13/08/2022 रोजी कारखान्याचे तज्ञ संचालक नागेश फाटे यांचे शुभहस्ते, रविवार दि.14/08/2022 रोजी कार्यकारी संचालक झुंजार आसबे व सोमवार दि.15/08/2022 रोजी कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांचे शुभहस्ते ध्वजारोहण करुन देशाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. सदर प्रसंगी राष्ट्रध्वजास राष्ट्रगीत गावुन सलामी देण्यात आली. तदनंतर मानवंदाना देवुन सुरक्षा जवानांनी परेड सादर केली.  

यावेळी कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे म्हणाले आपल्या देशास स्वातंत्र्य्‍ मिळुन 75 वर्षे पुर्ण झाली असून, अमृतमहोत्सवी दिन साजरा करीत आहेत. इंगजांच्या गुलामगिरीतुन आपला देश स्वातंत्र करण्यासाठी अनेक थोर क्रांतीकारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली अशा क्रांतीकारांच्या आठवणींना उजळा दिला. संचालक नागेश फाटे, कार्यकारी संचालक यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

            तसेच कारखाना कार्यस्थळावरील वसंतराव काळे विद्यामंदिर प्रशालेमध्ये कारखान्याचे संचालक भारत कोळेकर यांचे शुभहस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषण करुन देशभक्तीपर गीते गायली व कवायती सादर करण्यात आल्या. 

सदर प्रसंगी कारखान्याचे व्हा.चेअरमन राजेंद्र शिंदे, संचालक मोहन नागटिळक, राजाराम पाटील, विलास जगदाळे, इब्राहिम मुजावर, माजी संचालक प्रताप म्हेत्रे, भाळवणीचे मा.डेप्यु.सरपंच दाऊद शेख डेप्यु.जन.मॅनेजर के.आर. कदम,  सभासद, अधिकारी व कर्मचारी, प्रशालेतील सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होते.