मंगळवेढा बसस्थानकावरुन महिलेसह दोन मुली बेपत्ता..?
---------------------------------------------------------------------------------
*मंगळवेढा (पंढरी नगरी न्यूज) : मंगळवेढा बसस्थानक परिसरातून २५ वर्षीय महिलेसह दोन मुली बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पतीने पोलीसात दिली आहे. दरम्यान पोलीस त्या बेपत्ता महिलेचा कसून शोध घेत आहेत.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी, यातील बेपत्ता महिला ही पंढरपूर तालुक्यातील असून ती दि.२३रोजी घरी सोलापूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती करिता जात असल्याचे सांगून घरातून निघून आली होती. ती दुपारी १२ वाजता मंगळवेढा बसस्थानक परिसरातून बेपत्ता झाली असल्याचे तिच्या पतीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. महिलेचे वर्णन उंची ४ फुट, रंग मध्यम काळा, अंगाने जाड, सोबत सहा वर्षाची व तीन वर्षाची दोन मुली आहेत. त्यांचे वर्णन अंगात पांढर्या रंगाचा फ्रॉक, डोकीस पांढर्या रंगा बेल्ट, उची दोन फुट, रंगाने सावळी, दुसर्या मुलीचे वर्णन लाल रंगाचा टॉप व जीन पँट, उंची दीड फुट, रंग गोरा, अंगाने पातळ अशा वर्णनाच्या मायलेकी कोणाच्या निदर्शनास आल्यास मंगळवेढा शहरचे पोलीस हवालदार पठाण यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.