मंगळवेढा तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांची दमदार कामगिरी नागरिकांमधून होतेय "पोलिसातील माणूस, असल्याचे कौतुकाची चर्चा
------------------------------------------------------------------------------------
मंगळवेढा (दै. पंढरी नगरी न्युज ) : एक वर्षापूर्वी मंगळवेढा शहरातील महिलेच्या गळ्यातील चोरट्याने लुटून नेलेले दागिने मंगळवेढा पोलिसांनी चोरट्यांना पकडून त्यांच्याकडून चोरीचा ऐवज हस्तगत करून सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करीत पोलीस ठाण्यात संबंधित महिलेकडे सन्मानपूर्वक स्वाधीन करण्यात आल्याने पोलीस अधिकाऱ्यांच्या या कामगिरी बद्दल नागरिकांमधून पोलीस दादाचे कौतुक होत आहे.
दि. २४ डिसेंबर २०१९ रोजी मंगळवेढा शहरातील नागणेवाडी येथील मंदाकिनी सांवजी यांच्या बंगल्यात चोरट्याने प्रवेश करून नाव दांपत्याला दमदाटी व ठार मारण्याची धमकी देऊन ११ तोळे ३ ग्रॅम सोने ऐवज चोरट्याने पळवून नेऊन पोबारा केला होता .त्यानंतर मंगळवेढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी या प्रकरणात सखोल तपास करून तीन अट्टल दरोडेखोरांना अटक केली. त्यांच्याकडून संपूर्ण मुद्देमाल ही हस्तगत केला हा मुद्देमाल मूळ मालकाला परत करण्यासाठी पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी न्यायालयीन प्रक्रिया जलद गतीने करून मंदाकिनी सावजी यांना ५ लाख मोलाचे मंगळसूत्र आणि इतर वस्तू परत केल्याने त्यांनी पोलिसांचे आभार मानले. आपले चोरीला गेलेले दागिने परत मिळाल्याचे पाहून मंदाकिनी सावजी यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले होते .
याबाबत मंगळवेढा पोलिसांच्या या दमदार कामगिरीमुळे पोलीस निरीक्षक रणजीत माने हे जनमानसातील अधिकारी असल्याची चर्चा नागरिकांमधून होत आहे .त्यामुळे पोलीस खात्यावरील विश्वास पोलीस निरीक्षक माने यांच्या दमदार कामगिरी मुळे वाढल्याचे दिसून येत आहे .आशा पोलीस अधिकाऱ्यांच्या कर्तव्यदक्षतेचा योग्य तो सन्मान व्हावा व पुढच्या पिढीच्या समोर पोलिसांची प्रतिमा उंचावली जावी व त्यांचा आदर्श ठेवला जावा अशीच भावना सर्व सामान्य नागरिकांतून होत आहे. याबाबत आमच्या प्रतिनिधींनी मंगळवेढ्याचे पोलीस निरीक्षक श्री रणजीत माने बोलताना म्हणाली की, मंगळवेढा शहरातील महिलेच्या गळ्यातील चोरीला गेलेली वस्तू त्यांना परत मिळवून देऊ शकलो याचा आम्हाला आनंद होत आहे .त्यासाठी आमच्या सर्व पोलीस खात्यानेही मोठे कष्ट घेऊन चांगले काम केले असल्याचे पोलीस निरीक्षक माने यांनी सांगितले.