श्री .संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचा गुरुवारी दि. १९ रोजी बॉयलर सोहळा

श्री .संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचा गुरुवारी दि. १९ रोजी बॉयलर सोहळा

---------------------------------------------------------------------------------

मंगळवेढा (पंढरी नगरी न्यूज ) श्री. संत दामाजी साखर कारखान्याचा गुरुवार दि.१९ ऑक्टोंबर,२०२३ रोजी बायलर अग्निप्रदिपन समारंभ श्री. संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचा सन २०२३-२४ करिता ३१ व्या गळीत हंगामाचा बायलर अग्निप्रदिपन समारंभ ह.भ .प.जयवंत बोधले महाराज पंढरपूर यांचे शुभहस्ते तसेच कारखान्याचे मार्गदर्शक व धनश्री परिवाराचे संस्थापक शिवाजीराव बाजीराव काळुंगे यांचे अध्यक्षतेखाली गुरुवार दि.१९ ऑक्टोंबर, २०२३ रोजी सकाळी ठिक ११-३० वाजताचे शुभमुहूर्तावर संपन्न होणार आहे.

सदर कार्यक्रम कारखान्याचे मार्गदर्शक राहुल शहा (शेठजी) चेअरमन रतनचंद शहा सहकारी बँक लि. मंगळवेढा, नंदकुमार पवार, माजी चेअरमन दामाजी साखर कारखाना, रामकृष्ण (मामा) नागणे, मार्गदर्शक जिजामाता पतसंस्था मंगळवेढा,  दामोदरबापू देशमुख, चेअरमन बळीराजा पतसंस्था मंगळवेढा,  रामचंद्र वाकडे, माजी व्हा चेअरमन श्री संत दामाजी सह साखर कारखाना तसेच यादाप्पा माळी (सावकार) माजी संचालक  संत दामाजी सह .साखर कारखाना इत्यादी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

सदर दिवशी सकाळी ठिक १०-३० वाजता कारखान्याचे संचालक गौरीशंकर शरणाप्पा बुरकूल व त्यांच्या सुविद्य पत्नी शितल गौरीशंकर बुरकूल या उभयतांचे शुभहस्ते श्री .सत्यनारायण महापूजा आयोजित केली असलेची माहिती प्र.कार्यकारी संचालक रमेश जायभाय यांनी दिली. तरी सदर मंगलप्रसंगी कारखान्याचे सर्व सभासद, ऊस उत्पादक शेतकरी यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन  चेअरमन शिवानंद पाटील यांनी केले.

मंगळवेढा तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प झालेने कार्यक्षेत्रातील बराचसा ऊस जनांवरांना  चा-यासाठी गेला आहे. पाऊस नसल्याने ऊसाची वाढही व्यवस्थीत होवु शकली नाही. आपले तालुक्यासाठी वरदायीनी असलेल्या उजनी धरणातही अपेक्षेप्रमाणे पाणीसाठा होऊ शकला नाही. तरीही या हंगामात ४ लाख मे.टन ऊस गळीत करण्याचे कारखाना व्यवस्थापनाने ठरविले आहे. आपले कारखान्याने मागील हंगामातील ऊसबील जिल्हयात सर्वप्रथम दिलेने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा दामाजी कारखान्यावर भरवसा आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्याचे दामाजी कारखान्यावर असलेल्या विश्वासामुळे कारखान्याचा गळीत हंगाम निश्चितच यशस्वी पार पडेल. तरी सदर मंगलप्रसंगी कारखान्याचे सर्व सभासद, ऊस उत्पादक शेतकरी यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन चेअरमन शिवानंद पाटील व व्हा.चेअरमन  तानाजीभाऊ खरात यांनी केले आहे.