राहुल सार्वजनीक वाचनालयाचे आमदार बबनदादा शिंदे राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार प्रस्तावासाठी सर्वाना आवाहन..

राहुल सार्वजनीक वाचनालयाचे आमदार बबनदादा शिंदे राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार प्रस्तावासाठी सर्वाना आवाहन..

---------------------------------------------------------------------------------

माढा (दै.पंढरी नगरी न्यूज) : शासनमान्य राहुल सार्वजनिक वाचनालय शिंदेवाडी ता. माढा. जि. सोलापूर या वाचनालयाच्या वतीने आमदार श्री बबनराव शिंदे राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार २०२३ समारंभ पुर्वक देण्यात येणार  असल्याची माहिती राहुल सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष तथा ग्रंथ मित्र कांतीलाल साळुंखे यांनी दिली.

पुरस्कार प्राप्त निवडीमध्ये  जीवन गौरव.ग्रंथपाल.ग्रंथालय कार्यकर्ता. पत्रकार. खेळाडू. सामाजिक कार्यकर्ता. साहित्यिक. कवी इ .यांचा समावेश आहे. प्रस्तावासोबत दोन फोटो व बायो डेटा रजिस्टर पोस्टाने पाठवणे आवश्यक आहे.राज्यस्तरिय प्रेरणा पुरस्काराचे हे ५ वे  वर्ष आहे. पुरस्काराचे स्वरूप मानचिन्ह. प्रमाणपत्र.शाल.ग्रंथभेट असे आहे. आमदार बबनराव शिंदे व आमदार संजय मामा शिंदे यांच्या हस्ते राज्यस्तरीय प्रेरणा पुरस्कार समारंभ २६ फेब्रुवारी २०२३रोजी  सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे.

पुरस्करत्यानी आपले प्रस्ताव दिनांक १५/२/२०२३ पर्यंत  ग्रंथमित्र कांतीलाल साळुंके अध्यक्ष- राहुल सार्वजनिक वाचनालय शिंदेवाडी तालुका माढा जिल्हा सोलापूर - ४१३२०८
मो.नं ९८८१७०८३१५ या पत्यावर पाठविण्याचे आवाहन आयोजन पुरस्कार गौरव समितीचे अध्यक्ष उपसरपंच संजय सावंत यांनी केले आहे.