श्री .संत दामाजी साखर कारखान्याची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण दि. २४ .रोजी प्र.कार्यकारी संचालक - रमेश जायभाय यांची माहिती.

श्री .संत दामाजी साखर कारखान्याची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण दि. २४ .रोजी प्र.कार्यकारी संचालक - रमेश जायभाय यांची माहिती.

------------------------------------------------------------------------------------

मंगळवेढा;( पंढरी- नगरी न्यूज ) मंगळवेढा तालुक्यातील श्री. संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाची अधिमंडळाची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि.२४/०९/२०२३ रोजी दुपारी ठिक १।०० वाजता कारखान्याचे चेअरमन  शिवानंद पाटील यांचे अध्यक्षतेखाली कारखाना कार्यस्थळावर संपन्न होणार असल्याची माहिती कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक  रमेश जायभाय यांनी  .

सदरहु सभेमध्ये सभासदांच्या अनुपस्थितीची नोंद घेवून ती क्षमापित करणे, मागील सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे,  सन २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा संस्थेच्या कामकाजाविषयी अहवाल स्विकारणे, ताळेबंद व नफा-तोटा पत्रके स्विकारणे, त्यास मान्यता देणे, वैधानिक लेखापरिक्षक यांचेकडून आलेला लेखा परिक्षण अहवाल वाचून नोंद घेणे, मागील आर्थिक वर्ष २०२१-२२ चा मा .संचालक मंडळाने सादर केलेला दोष दुरुस्ती अहवाल स्विकारणे व त्यास मान्यता देणे, अंदाजपत्रकापेक्षा कमी-जास्त झालेल्या जमाखर्चास मंजूरी देणे, पुढील वर्षाकरिता मा.संचालक मंडळाने तयार केलेल्या अंदाजपत्रकास मान्यता देणे, पुढील आर्थिक वर्षाकरिता वैद्यानिक लेखापरिक्षक व  आवश्यकतेनुसार इतर सल्लागारांच्या नेमणूका करणे तसेच अध्यक्ष यांचे पूर्व परवानगीने सभासदांनी विचारलेले  प्रश्न व धोरणात्मक सुचना इत्यादी विषयांवर या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये विचार-विनीमय होणार असलेचे प्र.कार्यकारी संचालक   रमेश जायभाय यांनी सांगीतले.
     
आपल्या सभासदांच्या मालकीच्या श्री .संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या दि.२४/९/२०२३ रोजी संपन्न होणा-या अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी जास्तीत जास्त सभासदांनी उपस्थित रहाण्याचे आवाहन कारखान्याचे चेअरमन  शिवानंद पाटील  व व्हा .चेअरमन  तानाजी खरात यांनी केले आहे.