स्व. संजय. सविता स्मृती सार्व. वाचनालय प्रेरणादायी वास्तू - प्रदीप मोरे
-----------------------------------------------------------------------------------
मंगळवेढा (दै.पंढरी नगरी न्यूज ) : सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी प्राथमिक शिक्षणाधिकारी व सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक प्रदीप मोरे यांनी स्व. संजय - सविता स्मृती सार्वजनिक वाचनालयास सदिच्छा भेट दिली. सदरचे ग्रंथालय, ग्रंथसंपदा, संदर्भसेवा अतिशय मौल्यवान खजिना असून व्यवस्थापन अत्युत्कृष्ट असून कौतुक शब्द अपूरे पडतात. या वाचनालयाचा आणखी प्रचार प्रसार व विकास होणे गरजेचे आहे. वाचनालयाच्या उज्ज्वल भविष्यकाळासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष राकेश गायकवाड यांनी प्रदीप मोरे यांचा सत्कार ग्रंथभेट देऊन केला. याप्रसंगी दामाजी न्यूज चॅनेलचे वृत्तनिवेदक राजेंद्र जाधव, नाट्यपरिषदेचे यतिराज वाकळे, नारायण माने, आदर्श पांचाळ, दर्शन पांचाळ, सिद्राम हाके व वाचनालयाचे संचालक सतिश आवताडे उपस्थित होते.