संत दामाजी साखर कारखान्याची दिवाळी २०२४ सणाची साखर दर शुक्रवारी कारखाना साईटवर मिळणार चेअरमन :- शिवानंद पाटील, शेतकरी सभासदांना दिलासा, अपूर्ण शेअर्स, ऊसबील ॲडव्हान्स येणे बाकी ,बेणे अँडव्हान्स येणे, बेसल डोस थकबाकी व ऊस तोडणी वाहतूक थकबाकी सभासदांना साखर देता येणार नाही, संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय

---------------------------------------------------------------------------------

मंगळवेढा (दै.पंढरी नगरी न्यूज) मंगळवेढा येथील श्री. संत दामाजी सहकारी साखर कारखान्याची सभासदांना येणाÅया दिपावली २०२४ सणाचे निमित्ताने सवलतीचे दराने विक्री केली जाणारी साखर दि।२८/६/२०२४ पासुन पुढे प्रत्येक शुक्रवारी कारखाना साईटवर सकाळी १०-००ते सायं.५।०० या वेळेत देण्याचा निर्णय संचालक मंडळ सभेत झाला असलेची माहिती कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांनी दिली.

कारखान्याचे अपूर्ण शेअर्स, ऊस बिल अùडव्हान्स येणे, बेणे अùडव्हान्स येणे, बेसल डोस येणे, ऊस तोडणी वाहतूक येणे तसेच अन्य प्रकारची कारखान्याची येणेबाकी असणाऱ्या सभासदांची साखर शासनाच्या धोरणानुसार देता येणार नसलेची माहिती प्र.कार्यकारी संचालक रमेश जायभाय यांनी दिली.

कारखान्याने ठरवुन दिलेल्या दिवशी कारखाना साईटवरील साखर विक्री केंद्रावर आपले साखर कार्ड नोंद करुन सभासद बंधुनी आपले सोईनुसार वेळेत साखर घेवून जाणेविषयीचे आवाहन व्हाईस चेअरमन तानाजी खरात यांनी केले आहे.

सदर प्रसंगी संचालक सर्वश्री मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणूकाका पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिध्द लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर, प्र.कार्यकारी संचालक रमेश जायभाय उपस्थित होते.