कासेगाव परिसरात कोतवाल गुरुजींनी विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य व शिक्षणाची शिदोरी घरोघरी पोहोचवली जि.प. सदस्य - वसंत (नाना) देशमुख

कासेगाव परिसरात कोतवाल गुरुजींनी  विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य व शिक्षणाची शिदोरी घरोघरी पोहोचवली  जि.प. सदस्य -  वसंत (नाना) देशमुख

------------------------------------------------------------------------------------

कासेगांव (पंढरी नगरी न्यूज) कासेगाव व परिसरात कोतवाल गुरुजींनी शिक्षक सेवेमध्ये असताना शिक्षणाची शिदोरी सर्वसामान्य ,गोरगरीब जनतेच्या घरोघरी पोहोचवले असल्याचे प्रतिपादन कासेगाव जिल्हा परिषदेचे सदस्य तथा श्री .पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे संचालक वसंत (नाना )देशमुख यांनी गौरव उद्गार काढले . कासेगांव ता. पंढरपूर येथील सेवानिवृत्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक  कोतवाल गुरूजी यांचा ७५ वा अमृत महोत्सवी वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाचे नियोजन त्यांच्या तीन मुली व नातेवाईक यांनी कोतवाल गुरुजी यांच्या अमृत महोत्सवी जंगी वाढदिवसाच्या आयोजन करण्यात आले होते.
    
सांगली जिल्ह्यातील नागज गावचे रहिवासी १९७५ सली कासेगाव जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यांनी कासेगाव व पंचक्रोशीतील अनेक विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य केले.त्यांचे अनेक विद्यार्थी सामाजिक,  शैक्षणिक, राजकीय, कृषी, न्यायिक व वैद्यकीय अशा अनेक क्षेत्रात  विविध पदावरती कार्यरत आहेत. तत्कालीन परिस्थितीत गुरुजींनी व बाईंनी अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या परीने सर्वतोपरी सहकार्य करण्याचे धोरण अवलंबले होते, त्यामुळेच कासेगाव व कासेगाव पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना आदरणीय कोतवाल गुरुजी विषयी आजही आदर असल्याची भावना जिल्हा परिषदेचे सदस्य वसंतराव देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगत त्यांच्या भावना व्यक्त केल्या. वडिलांचा ७५ वा अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन रेश्मा, आशा, परवीन व जावई इकबाल शमशुद्दीन मुलानी, शकील शमशुद्दीन मुलानी व नयीम बादशहा वडगावकर व सर्व नातवाणी   केले.

सदर कार्यक्रमासाठी पंचायत समितीचे माजी उपसभापती विजय देशमुख व प्रशांत देशमुख उपस्थित होते. तसेच बादशहा वडगावकर, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब शेख, गप्पूर जमादार, पितांबर कापसे, एड. सुभाष देशमुख, तैमूरशहा इनामदार, शामराव खिलारे, प्रा.संतोष गंगथडे,प्रा. सुनील गवळी, दादासाहेब गावंदरे, प्रा. डॉ.बळवंत, प्रा.दत्ता खिलारे, अल्ताफ शेख, आप्पा साखरे, नवनाथ खिलारे भाऊसाहेब देशपांडे, ताजुद्दीन मुलानी, जाकिरभाई मुलानी, सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे अध्यक्ष रसाळ गुरुजी, पिसे गुरुजी नागज, दौंड गुरुजी पाचेगाव. तसेच कासेगाव व पंचक्रोशीतील गुरुजींचे सर्व आप्तेष्ट पाहुणे , मित्रपरिवार विध्यार्धी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.परवीन वडगावकर यांनी केले तर आभार इकबाल मुलांनी यांनी मानले.