शिवरत्न पब्लिक स्कूल अँड. ज्युनिअर कॉलेज मध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभाचा कार्यक्रम संपन्न....
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज ) पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील शिवरत्न पब्लिक स्कूल अँड .जुनिअर कॉलेज बारावीच्या विद्यार्थी- विद्यार्थिनींना निरोप समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.

यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे पंढरपूरचे मातब्बर शिवसेनेचे नेते तथा नियोजन मंडळ समिती सोलापूर सदस्य महेश साठे ,वैद्यकीय अधिकारी डॉ.विजयकुमार सरडे आदी उपस्थित होते. विद्यार्थी जीवनामध्ये बारावी एक महत्त्वपूर्ण टप्पा असल्याचे मत महेश साठे यांनी व्यक्त केली. मेडिकल क्षेत्र विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने खूप चांगले असल्याचे मत डॉ .सरडे यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबीवर सखोल मार्गदर्शन केले . यावेळी बोलताना कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे यांनी विद्यालयाची प्रगती व विद्यालयात राबविले जाणारे उपक्रम याविषयी माहिती आपल्या मनोगत मध्ये दिली .कार्यक्रम साठी अनिल बागल, रमेश बागल,संजय शेडगे, ब्रह्मदेव कदम,सहशिक्षक संतोष पवार ,राजेंद्र भोसले ,दीपक देशमुख नियाज मुलाणी,सोमनाथ भुईटे , नागेश कांबळे, वर्षा मोरे, शितल बागल, लीना बागल, शीतल मस्के, मसरुद्दीन पटेल, अजय मोरे ,सीमा रकटे, व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.