सिद्धेवाडी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक शहाजी शेनवे यांना जिल्हा परिषदेचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर कर्मभूमी तळसंगी गावातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण
---------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज ) सोलापूर जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाच्या वतीने सन- 2022 -23 या वर्षाकरिता देण्यात येणारा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार नुकताच सिद्धेवाडी ता. पंढरपूर ग्रामपंचायत आला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग ईशाधन शेळकंदे यांनी दिली आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने सिद्धेवाडी ग्रुप ग्रामपंचायत यांची आदर्श ग्रामसेवक पुरस्कारासाठी आपली निवड झाल्याचे पत्र दिले आहे.
आदर्श ग्रामसेवक म्हणून पुरस्कार निवड झालेले शहाजी शेनवे हे सध्या ग्रुप ग्रामपंचायत सिद्धेवाडी, चिचुंबे ,तरटगांव येथे ग्रामसेवक पदावर उत्कृष्ट अशा पद्धतीने सदैव काम करीत आहेत. या उल्लेखनीय कामाची दखल घेऊन सोलापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाने त्यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कारांसाठी त्यांची निवड करण्यात आली आहे. शहाजी शिंदे यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामपंचायतीच्या सरपंच रोहिणी जाधव, उपसरपंच लक्ष्मण गोडसे सर्व ग्रामपंचायत सदस्य, कारखान्याचे आजी- माजी संचालक, सोसायटीचे चेअरमन, दूध संघाचे संचालक ,यांनी ग्रामसेवक शेनवे यांचे अभिनंदन केले आहे. आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळालेले शहाजी शेनवे हे मंगळवेढा तालुक्यातील तळसंगी येथील रहिवासी असून सध्या ते पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत सिद्धेवाडी येथे काम करीत असून त्यांच्याकडे जादा पदभार म्हणून सरकोली, देवडे इत्यादी गावी देण्यात आली आहेत.
पुरस्काराचे वितरण शुक्रवार दिनांक 23 रोजी सकाळी 10 वाजता पंढरपूर येथील श्री यश पॅलेस नवीन करार नाका कोर्टी रोड येथे या ठिकाणी होणारा आहे. तरी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातील अधिकारी, कर्मचारी ,यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग ईशादन शेळकंदे यांनी केले आहे.