सिद्धेवाडी आरोग्य उपकेंद्रातील सेविका इंदुताई गवळी- नवले यांचा सेवानिवृत्ती बद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार...!

सिद्धेवाडी आरोग्य उपकेंद्रातील सेविका इंदुताई गवळी- नवले यांचा सेवानिवृत्ती बद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार...!

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर( पंढरी नगरी न्यूज ) पंढरपूर तालुक्यातील सिद्धेवाडी येथील कासेगाव अंतर्गत सिद्धेवाडी आरोग्य उपकेंद्रातील सेविका इंदुताई नवले गवळी यांचा सेवानिवृत्ती झाल्याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला . ग्रामपंचायत उपसरपंच लक्ष्मण गोडसे पुढे बोलताना म्हणाले की महात्मा गांधीजी व आचार्य विनोबा भावे यांचा वारसा जपणार्या  के. दलित मित्र तथा स्वतंत्र सैनिक लक्ष्मण  नवले यांचे सिद्धेवाडी गावांसाठी मोठे योगदान लाभले म्हणूनच सिद्धेवाडीचा सामाजिक व शैक्षणिक विकास झाला.

नवले कुंटुबातील सर्वच  व्यक्तींनी समाज सेवेचे कंकण हाती बांधून गावाची  अविरत सेवा केली. त्याला इंदूताई अपवाद नव्हत्या असे गौरवपूर्ण उदगार   माजी प्राचार्य व  उपसरपंच लक्ष्मण गोडसे यांनी येथे काढले. इंदूताई नवले - गवळी यांनी आरोग्य विभागात चाळीस वर्षे सेवा केली. त्यानिमित्ताने  कासेगाव व सिद्धेवाडी आरोग्य विभागाने त्यांचा सेवापूर्ती  सत्कार सोहळा आयोजित केला होता. त्यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून प्रा.लक्ष्मण गोडसे  बोलत होते. कै.लक्ष्मण नवले  कै. द्रौपदी नवले, कै दत्ता नवले,  सुशिला राक्षे, इंदूताई गवळी इ. चे गावासाठी मोठे योगदान लाभले असे प्रा. गोडसे  यांनी सांगितले.

यावेळी सत्कार सोहळ्यास आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, आशावर्कर,  गावचे सरपंच मिस्टर पती सारंग जाधव, ग्रामपंचायत कर्मचारी भास्कर जाधव, रावसाहेब भोपळे, बाळासाहेब ननवरे, धनाजी घुले, आदर्श अंगणवाडी सेवानिवृत्त शिक्षिका सुशीला  राक्षे, सुजाता नवले,  इ. उपस्थित होते. उपस्थितानी त्यांचा शाल, हार, साडी देवून सत्कार केला . उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली . कार्यक्रमास प्राथमिक शाळेतील शिक्षिका ,अंगणवाडी सेविका ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.