आ.समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमात मिस्ट अन्नाचे वाटप!
-----------------------------------------------------------------------------------
पंढरपुरातील समाधान दादा अवताडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष:- प्रसाद भैया कळसे यांचा उपक्रम ,
-----------------------------------------------------------------------------------
( दै.पंढरी नगरी न्यूज): पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे पाणीदार आमदार मा. समाधानदादा आवताडे यांच्या ४६ व्या वाढदिवसानिमित्त आमदार समाधान दादा आवताडे प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष श्री प्रसाद (भैया) कळसे यांनी मातोश्री वृद्धाश्रम गोपाळपूर येथील वृद्ध माता - पित्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले.
अन्न पूर्ण ब्रम्ह या पवित्र परंपरेला साजेशे कार्य करण्यासाठी आमदारपुत्र तथा युवक नेते मा. विराजदादा आवताडे यांच्या नेतृत्वाखाली या भावना संवेदनशील आणि कौतुकास्पद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पद, प्रतिष्ठा आणि अधिकार यांच्या पलीकडे मानवतेची वीण घट्ट करणारे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार मा. दादासाहेब यांच्या व्यक्तिमत्व कृतीचा आदर केला जातो.
यावेळी महेश दादा चव्हाण,माऊली गांडुळे,श्री. उमेश सर्वगोड, अजित लेंडवे आदी मान्यवर उपस्थित होते.