बार्शीच्या कॉलेज ऑफ एज्युकेशनला नॅकची "अ" श्रेणी प्राप्त कॉलेज कमिटीचे योग्य नियोजन व दर्जेदार शिक्षण

बार्शीच्या कॉलेज ऑफ एज्युकेशनला नॅकची "अ" श्रेणी प्राप्त  कॉलेज कमिटीचे योग्य नियोजन व दर्जेदार शिक्षण

---------------------------------------------------------------------------------

सोलापूर;( पंढरी नगरी न्यूज ) श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी  या महाविद्यालयास नॅक, बेंगलोर या  राष्ट्रीय मूल्यांकन संस्थेने "अ" श्रेणी दिली आहे. दिनांक  २० व २१ नोव्हेंबर २०२३ रोजी नॅक पिअर टीमने महाविद्यालयास भेट दिली.

या समितीमध्ये हिमाचल प्रदेशचे डॉ. विशाल सुद,  तामिळनाडू येथील डॉ. चंद्रशेखरन कल्याणीतेवर व कर्नाटक येथील डॉ. विजयकुमार एक्झाम्बी हे नॅक पिअर टीममध्ये उपस्थित होते. या समितीने महाविद्यालयाच्या भौतिक व मानवी सुविधांची सखोल तपासणी केली. यामध्ये महाविद्यालयाची इमारत, ग्रंथालय, जलतरण तलाव, इनडोअर हॉल,  विविध क्रीडांगणे, संशोधन केंद्र, एनएसएसची माहिती घेतली. तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी वार्षिक निकाल, शिक्षकांचे व्यवसायिक विकास, तज्ञ प्राध्यापक वृंद, संशोधन लेख, माजी विद्यार्थी संस्था याचीही माहिती घेतली. महाविद्यालयाच्या भौतिक व मानवी सुविधा जोरावरच महाविद्यालयाने ३.०४ गुण मिळवून अ श्रेणी प्राप्त केली आहे.

याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. बी वाय यादव, उपाध्यक्ष श्री. नंदकुमार जगदाळे, जनरल सेक्रेटरी श्री. पी टी पाटील, जॉईट सेक्रेटरी श्री. ए पी देबडवार, खजिनदार श्री. जयकुमार बापू शितोळे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य यांनी महाविद्यालयाचे आदर्श प्राचार्य डॉ. एस .एस गोरे, आयक्यूएसी  समन्वयक प्रा. डॉ. व्ही पी शिखरे, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी, पालक व   विद्यार्थी यांचे अभिनंदन केले आहे.