आंबे येथील ओम गुळ कारखाना शेतकऱ्याच्या ऊसाला २५०० रुपये दर जाहीर
--------------------------------------------------------------------
पंढरपूर( दै. पंढरी नगरी न्यूज) : आंबे येथील ओम गुरु कारखान्याने शेतकऱ्यांच्या उसाला २५०० रुपये दर देणार असल्याची माहिती कारखान्याची मार्गदर्शक तथा पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी दिली.
पंढरपूर तालुक्यात वर्षानुवर्षे ऊस लागवडीचे प्रमाण वाढत चालली असून तालुक्यातील उसाचा प्रश्न गंभीर बनला जात असल्याने तसेच शेतकऱ्यांचा ऊस वेळेवर गाळपासाठी जाऊन उसाचे पैसे मिळण्याकरता पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार दत्तात्रेय सावंत यांनी आंबे येथील उजाड माळरानावर अडीच एकर जागेत ओम गुळ कारखान्याची उभारणी करून पंढरपूर -मोहोळ मंगळवेढा या भागातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत व सामाजिक सेवा करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
ओम गुरु कारखान्याचा यावर्षीचा दुसरा गळीत हंगाम कारखान्याच्या व्यवस्थापक कडून व्यवस्थित नियोजन सुरू असून कारखाना सद्यस्थितीत चांगल्या पद्धतीने गाळपाचे उद्दिष्ट पार करीत आहे .
त्याचबरोबर जिल्ह्यातील काही सहकारी साखर कारखान्याने आपापल्या पद्धतीने ऊस तोडीचे नियोजन करून कारखान्याचे गाळप ही सुरू आहे. परंतु सध्या गेले पंधरा दिवसापासून सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या ऊसाला ज्यादा दर मिळण्याकरता सर्वपक्षीय शेतकरी संघटनेने ऊस संघर्ष समितीने पंढरपूर -मंगळवेढा येथे उग्र स्वरूपाचे आंदोलन सुरू केले असून जिल्ह्यात ऊस तोडणी कार्यक्रम बंद ठेवण्यात आले आहे .शेतकऱ्याच्या उसाला जादा दर देण्याची मागणी करून तालुक्यात दरवाढी विषयी चांगली रान पेटवली आहे शेतकरी संघटने कडून वाहनांची टायर फोडून नुकसान ही करण्यात आली आहे.
त्यामुळे मंगळवेढा -पंढरपूर मोहोळ .तालुक्यातील ऊसतोड यंत्रणा ठप्प झाली आहे संघर्ष समितीचे पदाधिकारी अनेक मार्गाने हे आंदोलन पुढे घेऊन जात असली तरी जिल्ह्यातील कोणत्याही साखर कारखानदाराने ऊस दराची कोंडी फोडण्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसून येत नसल्याने ओम गुळ कारखान्याचे मार्गदर्शक दत्तात्रय सावंत यांनी शेतकऱ्याच्या ऊसाला पहिली उचल व अंतिम दर अडीच हजार रुपये दर देऊन पंधरा दिवसात शेतकऱ्याच्या खात्यावर उसाची रक्कम जमा करण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी दिली तसेच शेतकरी बांधवांनी आपला जास्तीत जास्त ऊस ओम गूळ कारखान्याकडे गाळप करण्याचे आवाहन केले असून आपल्या उसाचे वजन कोणत्याही वजन काट्यावर करून आणावे असे त्यांनी सांगितले आहे. ओम गूळ कारखान्यात कोणत्याही उपपदार्थाची निर्मिती होत नाही तरीही ओम गुळ कारखाना इतरापेक्षा २५००रु देण्यास तयार आहे. तरी पंढरपूर -मंगळवेढा मोहोळ .येथील ऊस उत्पादक शेतकरी बांधवांनी आपला ऊस आमच्या कारखान्याकडे गाळपासाठी देण्यात यावा .असे आवाहन शेवटी सावंत यांनी केली आहे.