गुरसाळे येथील श्री विठ्ठल सह साखर कारखान्याचा सोमवारी बॉयलर पेटवणार :-
------------------------------------------------------------------------------
*पंढरपूर,(प्रतिनिधी)* गुरसाळे तालुका पंढरपूर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा ४१ वा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ सोमवार दिनांक २६ सप्टेंबर रोजी सकाळी १०:०० वा. शुभारंभ करण्यात येणार असल्याची माहिती विठ्ठल परिवाराचे नेते व कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांनी दिली.
पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा ४१ वा गळीत हंगामाचा बॉयलरअग्निप्रदिपन समारंभ संत तुकाराम महाराज यांचे दहावे वंशज व श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहू माजी अध्यक्ष ह.भ.प.श्रीगुरु बापूसाहेब महाराज देहूकर यांच्या शुभहस्ते उत्साही वातावरणात होणार असून होम हवन पूजा गोपाळपूर स्वेरी कॉलेजचे संस्थापक सचिव बब्रुवान रोंगे व त्यांच्या पत्नी प्रेमलता रोंगे या उभयतांच्या शुभहस्ते सकाळी ९:०० वा. कारखाना कार्यस्थळावर आयोजित केला आहे .तरी या शुभ मंगलप्रसंगी सभासद शेतकरी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन चेअरमन अभिजीत पाटील यांनी केले.