सिताराम महाराज साखर कारखान्यात २ लाख मे.टनाचे उचांकी गाळप व कामगारांना गणवेशाचे वाटप..

सिताराम महाराज साखर कारखान्यात २ लाख मे.टनाचे उचांकी गाळप व  कामगारांना गणवेशाचे वाटप..

---------------------------------------------------------------------------------

पंढरपूर( दै. पंढरी नगरी न्यूज ) : पंढरपूर तालुक्यातील सिताराम महाराज साखर कारखाना खर्डी ,या कारखान्याने १ जानेवारी या नवीन वर्षात चालू गळीत हंगामामध्ये २ लाख मॅट्रिक टन उसाचे उचांकी गाळप झाले आहे. त्यानिमित्त कारखान्यातील सर्व विभागातील खाते प्रमुख व कर्मचारी यांना खातेनिहाय मोफत गणवेशाचे वाटप धनश्री परिवाराचे प्रमुख प्रा ,शिवाजीराव काळुंगे तसेच सिताराम महाराज साखर कारखान्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजलक्ष्मी गायकवाड - काळुंगे यांच्या हस्ते कामगारांना २ लाख मेट्रिक टन उसाचे उत्चांकी गाळप केल्याबद्दल ( ड्रेस कोड ) मोफत गणवेशाचे वाटप करण्यात आले.

यावेळी जनरल मॅनेजर हनुमंत पाटील. मुख्य शेती अधिकारी पी. जी.शिंदे .शेती अधिकारी डी. एस. रोकडे. टेक्निकल जनरल मॅनेजर पाटील. कार्यालय सुप्रिडेंट डी. एम .सुतार ,चिप केमिस्ट इंजिनिअर नागणे .सुरक्षा अधिकारी माळी. इत्यादी कारखान्यातील सर्व विभाग प्रमुख कर्मचारी कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.