शिवरत्न विद्यालय जुनियर कॉलेजचा विद्यार्थी रोहन भूसनर यास सिल्वर मेडल पदकाने सन्मानित

शिवरत्न विद्यालय जुनियर कॉलेजचा विद्यार्थी रोहन भूसनर यास सिल्वर मेडल पदकाने सन्मानित

---------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज ) : तामिळनाडू येथे पार पडलेल्या ऑल इंडिया आट्यापाट्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या संघाला सिल्वर मेडल प्राप्त .नुकतीच महाराष्ट्रातील खेळाडूंची निवड होऊन राष्ट्रीय आट्यापाट्या  स्पर्धा तामिळनाडू येथे आयोजित केली होती. या स्पर्धेसाठी देशातील सर्व राज्यांमध्ये खेळाडू आपले संघ घेऊन आले होते. या स्पर्धा अतिशय नेत्रदीपक व अटीतटीच्या पार पडल्या या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाला व मुलींच्या संघाला सिल्वर मेडल प्राप्त झाले. सोलापूर जिल्ह्यातून एकमेव निवडलेला शिवरत्न  कॉलेज गादेगावच रोहन भुसणर याला सिल्वर मेडल परिधान करून सन्मानित करण्यात आले.

तामिळनाडू येथील सामन्यामध्ये केरळ राज्याच्या संघाने गोल्ड मेडल मिळविले महाराष्ट्राच्या विजय संघाचे आट्यापाट्या असोसिएशनचे ऑल इंडिया संस्थापक अध्यक्ष दिपकजी  कवीश्वर सर, महाराष्ट्र राज्य सचिव आमरजी चकोले सर , राज्य सहसचिव शरद गवार सर ,आरसीसी क्लासेस लातूरचे शिवराज मोटेगावकर सर, सोलापूर जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब कापसे ,उपाध्यक्ष राजेंद्र मुंबरे सर, जिजाऊ खांडवी चे संभाजी घाडगे सर, अमित सर त्याचबरोबर प्रशिक्षक मल्हारी भुसणर, दत्ता झांबरे, जगन्नाथ ओव्हाळ, विकास बागल, अनिल बागल, महेंद्र टिंगरे, रावसाहेब माने, उपसरपंच संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे सर विद्यालयातील सहशिक्षक राजेंद्र भोसले, सोमनाथ भुईटे, नागेश कांबळे, नियाज मुलाणी, संतोष पवार, दीपक देशमुख, वर्षा मोरे, शितल बागल, लिना बागल, शितल मस्के, मसरूद्दीन पटेल, सिमा रकटे, अजय मोरे, व गादेगाव ग्रामस्थ यांनी रोहनचे आभिनंदन केले.