पंढरपुरातील कॉरिडॉर आणि डीपी रस्ते अन्य प्रश्न संदर्भात जिल्हा अधिकारी यांना निवेदन..

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज) : पंढरपूर शहरातील होणाऱ्या कॉरिडॉर आणि डीपी रस्ते तसेच १९८२ साली  विस्थापित झालेल्या नागरिकांना प्लॉट मिळणे संदर्भात आज सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर साहेब यांच्या निवासस्थानी या सर्व  विषयावर चर्चा करण्यात येऊन  जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले..

यावेळी संत भूमी बचाव समितीचे अध्यक्ष आदित्य फत्तेपूरकर, आरपीआयचे शहराध्यक्ष एडवोकेट कीर्तीपाल सर्वगोड, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे ,नगरसेवक महंमद उस्ताद, मनसेचे उपशहर अध्यक्ष गणेश पिंपळनेरकर ,व्यापारी महासंघाचे कौस्तुभ गुंडेवार ,पंढरपूरचे प्रांत अधिकारी गजानन गुरव ,पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अरविंद माळी इ.उपस्थित होते..