पंढरपूर नगरपालिकेने भरदिवसा रोडलाईट चालु ठेवण्याचा दिला ठेकेदाराला ठेका , आम आदमी पार्टी झाडूसेना आंदोलन करणार--, जिल्हा अध्यक्ष नागेश पवार

पंढरपूर नगरपालिकेने  भरदिवसा रोडलाईट चालु ठेवण्याचा दिला ठेकेदाराला ठेका ,  आम आदमी पार्टी झाडूसेना आंदोलन करणार--, जिल्हा अध्यक्ष नागेश पवार

-------------------------------------

पंढरपूर ( दै.पंढरी नगरी न्यूज ) पंढरपूर शहरात मागील दोन महिन्यापासून रोडलाईट दिवसभर सुरु असून,आम आदमी पार्टी झाडु सेना सदर अधिकारी यांना रोडलाईट बंद करा म्हणुन वारंवार फोन करत असुन,ठेकेदार व अधिकारी या गोष्टीकडे जाणून दुर्लक्ष करीत असून त्यांना वाटणीवर आणण्यासाठी पार्टी झाडूसेना नगरपालिकेपुढे झाडू आंदोलन करणार असल्याचा इशारा आम आदमी झाडूसेना पार्टीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष नागेश पवार यांनी दिला आहे .

पंढरपूर नगरपालिकेची अधिकारी हे कामचुकार व हुकूमशाही पद्धतीने वागत असून नागरिकांच्या प्रश्नाला सतत उडवावुडवीची उतरे देतात नगरपालिकेचे अधिकारी ठेकेदारास अशा गोष्टीस सहकार्य करतात त्यामुळे नगरपालिकेचे नियोजन करण्यात तीन तेरा होत असल्याचे सध्या दिसून येत आहे. अशा निष्काळजी पणामुळे जनतेच्या पैशाचा अपवय,स्वतः ठेकेदार व6 अधिकारी आपल्या घरची लाईट दिवस भर चालु ठेवतील का? असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडत आहे.

नगरपालिकेच्या अधिकारी यांचा नगरपालिकेचे कर्तव्य न बजावता पगारावर ऐश आराम चालला?मग कसे नगरपालिकेचे उत्पन्न वाढणार व नागरीकांच्या टॅक्स ची बचत होणार,नगरपालिका पैसे नाहीत म्हणुन नागरीकांचे टॅक्स वाढवित आहे हे बरोबर का? मुळीच नाही,आणि पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आमदार समाधान आवताडे तर पंढरपूर शहरामध्ये सर्व काही चांगले असल्याचे समजून ते त्यांच्या आनंदात आहेत असा आरोप सोलापूर जिल्हा आम आदमी पार्टी झाडू सेनेचे जिल्हाध्यक्ष नागेश पवार यांनी केला आहे तर पंढरपूर नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी आधिकारी हे इतर खाजगी कामात व्यस्त असल्याचे दिसून येत असल्याचे माहिती पत्रकारद्वारे दिली आहे. अशा नगरपालिका अधिकारी यांच्या बेजबाबदार वागणुकीच्या विरोधात पंढरपूर

आम आदमी पार्टी झाडुसेना गप्प बसणार नाही, आता नगरपालिके समोर करणार आंदोलन.

 नागेश पवार जिल्हाअध्यक्ष आम आदमी पार्टी झाडुसेना सोलापूर