बार्शीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात पीएच डी ऑनलाईन कार्यशाळेचे यशस्वी आयोजन :- प्राचार्य एस .एस. गोरे यांची माहिती,
------------------------------------------------------------------------------------
बार्शी (पंढरी नगरी न्युज) बार्शी येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित शिक्षणशास्त्र महाविद्यालय, बार्शी येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि पीएच डी संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १९ एप्रिल ते २९ एप्रिल २०२३ या कालावधीत पेट आठ मध्ये प्रवेशित असलेल्या संशोधन विद्यार्थ्यांसाठी कोर्स वर्क ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. अशी माहिती शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य एस. एस. यांनी दिली.
बार्शी शिक्षणशास्त्र महाविद्यालयात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे पीएच डी शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्राचे संशोधन केंद्र आहे. या केंद्रांतर्गत पेट आठ मध्ये प्रवेश घेतलेल्या संशोधन विद्यार्थ्यांसाठी कोर्स वर्क पूर्ण करणे आवश्यक आहे. या कोर्समध्ये पेपरनिहाय तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती.
यामध्ये संशोधन कार्यपद्धती, माहिती आणि संगणक तंत्रज्ञान, संशोधन आणि प्रकाशन नीतीतत्वे, शिक्षणशास्त्र क्षेत्रातील आधुनिक ज्ञान यासंदर्भात ऑनलाईन व्याख्याने देण्यात आली. तात्विक व्याख्यान याबरोबरच सेमिनार, प्रपाठ, कोर्स वर्क अहवाल, ग्रंथालय कार्य, शोधनिबंध लेखन, वेबिनार सहभाग आदी प्रात्यक्षिके संशोधन विद्यार्थ्यांनी पूर्ण केली. या कार्यशाळेत विद्यापीठ कार्यक्षेत्रातील एकूण ६४ पीएच डी संशोधन विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
कार्यशाळेचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एस गोरे यांनी केले. यावेळी ते म्हणाले,संशोधन हे ज्ञानाची पातळी वाढवण्यासाठी एखाद्या विषयाच्या पद्धतशीर अभ्यासातून केले जाते. दैनंदिन जीवनातील समस्या सोडविण्यासाठी संशोधन महत्वाचे आहे. संशोधन हे सामाजिक उपयुक्ततेसाठी गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यशाळेत तज्ञ साधन व्यक्ती म्हणून प्राचार्य डॉ एस एस गोरे, आंतर विद्याशाखा अभ्यासचे अधिष्ठाता डॉ. व्ही पी शिखरे, डॉ ए जी कांबळे, डॉ एम एस डिसले, डॉ आर ए फुरडे, डॉ एम व्ही मते, डॉ पी ए पाटील, डॉ एस एल जाधव, प्राचार्य डॉ एस एल तांबे, प्राचार्य डॉ व्ही डी पांढरे, डॉ एल आय राठोड यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे समन्वयक म्हणून डॉ एम व्ही मते यांनी कार्य केले.