तपकिर शेटफळ येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त विविध स्पर्धा तसेच, आदर्श प्राचार्य पुरस्कार प्राप्त सुग्रीव गोरे यांचा भव्य नागरी सत्काराचे आयोजन..
-----------------------------------------------------------------------------------
पंढरपूर( दै. पंढरी नगरी न्युज) पंढरपूर तालुक्यातील तपकीर शेटफळ येथील विश्वभूषण भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आली असल्याची माहिती विश्व भूषण डॉ .बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष शत्रुघन कांबळे सर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.
दिनांक १३ एप्रिल रोजी इयत्ता १ली ते११वी तसेच पदवीधर या वर्गातील स्पर्धकांसाठी खुल्या स्पर्धा ,सुंदर हस्ताक्षर ,जनरल नॉलेज या विविध स्पर्धां घेण्यात येणार असून या विजेत्या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ रविवार दिनांक १६ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता व शिक्षणशास्त्र महा विद्यालय बार्शीचे नामवंत शिक्षण तज्ञ प्राचार्य तसेच तपकिरी शेटफळ चे सुपुत्र सुग्रीव गोरे (सर )यांना भारत देशाचा आदर्श प्राचार्य पुरस्कार मिळाले बद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा संपन्न होणार आहे.
या भव्य दिव्य कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर जिल्हा ग्रंथालयाचे ग्रंथालय अधिकारी संतोष कुमार जाधव, सहाय्यक प्रशासन अधिकारी बांधकाम विभाग जिल्हा परिषद सोलापूर तथा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष अविनाश गोडसे ,सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे सहसचिव अन्सार शेख, ज्योतीराम गायकवाड सर, संजय गवळी सर, ग्रामपंचायतीच्या सरपंच नूतन मासाळ यांच्या प्रमुख उपस्थित कार्यक्रम होणार आहे .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रंथालय संघाचे महाराष्ट्र राज्य निमंत्रित सदस्य गुलाबराव पाटील हे उपस्थित राहणार आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त घेण्यात आलेल्या विजेत्या स्पर्धकास सन्मानचिन्ह रोख रक्कम पाहुण्यांच्या शुभ हस्ते देण्यात येणार असून कार्यक्रमाचे ठिकाण श्री समर्थ स्कूल दाजी महाराज मठा शेजारी तनाळी तपकिरी शेटफळ येथे होणार आहे. तरी या कार्यक्रमास तपकिरी शेटफळ व पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष शत्रुघन कांबळे( सर )यांनी केले आहे.