सोलापूर येथील कोषागार कार्यालयात लाच घेताना महिला लिपिकास रंगेहाथ पकडले; उपअधीक्षक गणेश कुंभार याची कारवाई

सोलापूर येथील कोषागार कार्यालयात लाच घेताना महिला लिपिकास रंगेहाथ पकडले; उपअधीक्षक गणेश कुंभार याची कारवाई

____________________________________________________

सोलापूर दै.पंढरी-नगरी न्यूज :  जिल्हा परिषद सोलापूरचे शिक्षण अधिकारी किरण लोहार यांचं लाचखोर प्रकरण उघडकीस येऊन ४८ तास उलटत नाहीत तोच आज आणखी एक सरकारी कर्मचारी महिलेस लाच घेताना पकडण्यात आलं आहे. सोलापूर जिल्हा कोषागार कार्यालयातील महिला लिपिक अश्विनी  बडवणें वय ३४, पद-लेखा लिपिक राहणार सिद्धेश्वर नगर, सैफुल, सोलापूर यांना ४५०० रुपयांची लाच घेताना सोलापूर लाच लुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी आज सायंकाळी कार्यालयात रंगेहात पकडलं आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर विभागाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त गणेश कुंभार यांच्या नेतृत्वाखाली पहिलीच कारवाई झाली आहे. यातील तक्रारदार यांचे वडील सन २०२१ मध्ये मयत झाले असून, तक्रारदार यांचं आईस मिळणाऱ्या फॅमिली पेन्शनचे बील वेळेत काढयाकरिता यातील आलोसे यांनी स्वतः करीता तसेच कार्यालयातील इतर कर्मचारी यांच्याकरीता ६,०००/- रुपये लाचेची मागणी करुन त्यापैकी पहिला हप्ता १५०० /- रुपये यापुर्वी स्विकारले असुन, आज रोजी पडताळणी कारवाई दरम्यान उर्वरित ४५००/- रुपये लाचेची मागणी करुन सदर लाच रक्कम कोषागार कार्यालय सोलापूर येथे बील रजिस्टर मध्ये ठेवण्यास सांगुन लाच रक्कम स्विकारली असता, त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. यातील आरोपी यांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले असुन गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.