सिताराम महाराज साखर कारखान्याचा बैल पोळा सणानिमित्त १०० रुपयांचा हप्ता ऊस पुरवठा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा - चेअरमन शोभा काळुंगे,

सिताराम महाराज साखर  कारखान्याचा बैल पोळा सणानिमित्त १०० रुपयांचा हप्ता ऊस पुरवठा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा - चेअरमन शोभा काळुंगे,

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (पंढरी नगरी न्युज ) पंढरपूर तालुक्यातील सिताराम महाराज सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांना बैलपोळा सणासाठी  १०० रुपयांचा हप्ता ऊस पुरवठा शेतकऱ्यांच्या बँक खाती जमा केला असल्याची माहिती कारखान्याच्या चेअरमन शोभा काळुंगे यांनी दिली.

सिताराम महाराज साखर कारखाना हा शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र राहून गेली दोन वर्षात शेतकरी, तोडणी- वाहतूक ठेकेदार आणि कामगार यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत .अशी माहिती सिताराम साखर कारखान्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजलक्ष्मी गायकवाड यांनी सांगितले. तसेच कारखान्याने आधुनिककरण करून या हंगामात ३५०० प्रति दिन ऊस गाळप करणार आहे. आणि आधुनिक आसवणी प्रकल्प उभा करीत आहे. त्यामुळे पंढरपूर- मंगळवेढा आणि सांगोला या भागातील ऊस उतपादक सभासद यांची आर्थिक उन्नती होणार आहे. भागातील सर्व शेतकरी बंधू भगिनी यांनी त्यांचा ऊस या वर्षी गाळपास देऊन सहकार्य करावे असे सांगितले. तसेच ऊस पुरवठा शेतकरी यांची दिवाळी गोड होणार असल्याची माहिती राजलक्षमी गायकवाड यांनी या वेळी दिली.

या वेळी धनश्री व सिताराम परिवारचे संस्थापक प्रा. शिवाजीराव काळुंगे यांनी बैल पोळा सणनिमित्त शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.