बार्शी येथील श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालयात शहीद दिनानिमित्त भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना अभिवादन

बार्शी येथील श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालयात शहीद दिनानिमित्त भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना अभिवादन

------------------------------------------------------------------------------------

बार्शी (दैनिक, पंढरी नगरी न्युज) श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालय,बार्शी येथे शहिद दिना निमित्त २३ मार्च २०२५ रविवार रोजी भारतमातेचे वीर सुपुत्र थोर क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव, आणि राजगुरु यांना विनम्र क्रांतिकारक अभिवादन करण्यात आले. 

भारतमातेचे वीर थोर सुपुत्र शहीद भगतसिंग,सुखदेव,राजगुरु यांच्या प्रतिमेचे पुजन व विनम्र अभिवादन वाचनालयाचे अध्यक्ष किशोर श्रीमाळ,संचालक धिरज कुंकूलोळ,आनंद सुराणा यांचे शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी वाचनालयाचे वाचक वर्ग व सभासद उपस्थित होते. या सर्वांनी शहीद दिना निमित्त शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन संचालक धिरज कुंकूलोळ यांनी केले. वाचनालयाचे ग्रंथपाल सुरेश यादव क्लार्क विराज पतंगे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले . या कार्यक्रमास नागरिक ,वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.