महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर होणारे सहा पैकी तीन उपोषण सामाेपचाराने मिटवण्यात पोलिस प्रशासनास यश
---------------------------------------------------------------------------------
मंगळवेढा(पंढरी नगरी न्यूज) : महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर एकूण ६ जणांनी विविध प्रश्नावर उपोषण करण्याचा लेखी इशारा पोलिस प्रशासनास दिला होता.दरम्यान यामधील तीघा जणांचे उपोषण सामोपचाराचे मिटविण्यात पोलिस प्रशासनास यश आले आहे.
दि.१ मे महाराष्ट्रदिनी मंगळवेढा शहर व ग्रामीण भागातील एकूण ६ व्यक्तींनी विविध प्रश्नावर उपोषण करण्याचा लेखी निवेदनाव्दारे पोलिस प्रशासनास इशारा दिला होता.दरम्यान यामध्ये खडकी येथील संतोष कसबे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कारवाईसाठी त्यांनी उपोषण करण्याचा इशारा दिला होता.यामध्ये पोलिस प्रशासन व अर्जदार यांच्यात समझोता झाल्याने हे उपोषण स्थगित करण्यात आले.
दुसरे उपोषण महिला शारदा होवाळ यांचे टोळ नाका येथील ५ गुंठे प्लॉटमध्ये पत्रा शेड मारल्याने वाद झाला होता. याबाबत त्यांनी उपोषणाचा इशारा दिल्यावर पोलिस प्रशासनाने त्यांच्यात समझोता होवून उपोषण स्थगित करण्यात आले. तिसरे उपोषण महाराष्ट्र लोकहितवादीचे अध्यक्ष संतोष माने तसेच उध्दव ठाकरे शिवसेनेचे नारायण गोवे यांनी मंगळवेढा तालुक्यात अवैध धंदे मोठया प्रमाणात बोकाळले असून भविष्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होण्याची शक्यता आहे,अवैध धंदयाकडून मंथली एक पोलिस हवालदार वसुली करीत असल्याने अवैध व्यवसायाला बळ मिळत असल्याचा आरोप तक्रारदारांचा होता.
पडोळकवाडी येथील वृध्द महिलेचा दरोडेखोरांनी केलेल्या खूनाचा तपास लावण्यात अपयश, त्याचबरोबर परराज्यातील एका लहान बालकाचे अपहरणकर्त्याचा शोध घेण्यात दिरंगाई या महत्वाच्या सामाजिक मुद्दयावर डी.वाय.एस.पी.कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील यांना दिला होता.त्यांनी या तक्रारीची दखल घेवून अवैध धंदयांना पाठबळ देणार्या व मनमानी कारभार करून दहशत माजविणार्या अधिकार्याची सखोल चौकशी करून अवैध धंदयावर कारवाई करून समूळ उच्चाटन केले जाईल असे लेखी पत्र डी.वाय.एस.पी यांनी दिल्याने हे आंदोलन तुर्त स्थगित करण्यात आले.
वरील तीन आंदोलने सामोपचाराने मिटविण्यात पोलिस प्रशासनास यश आले आहे. तर प्रहार संघटनेने प्रांत कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य विदयुत पारेषण कंपनीच्या गेलेल्या तारेखालील विविध झाडांचा मोबदला मिळावा या मागणीसाठी अर्धनग्न आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.
त्याचबरोबर डॉ.दत्ता माळी यांनी मंगळवेढा शहरालगत श्री संत कान्होपात्रा ही नव्याने ग्रामपंचायत संतांच्या नावे स्थापन करावे यासाठी आपल्या आंदोलनावर ते ठाम होते.दरम्यान श्री संत व श्री संत चोखामेळा या दोन संतांच्या नावावर ग्रामपंचायती आहेत. त्याचपध्दतीने संत कान्होपात्रांच्या नावेही ग्रामपंचायत व्हावी अशी त्यांची मागणी आहे. ग्रामपंचायतीला मंजूरी मिळाली आहे मात्र त्याची पुर्तता झालेली नाही. वंचित आघाडीचे कार्यकर्ते तहसील कार्यालयासमोर जालिहाळ येथील सौर ऊजेअंतर्गत येणार्या बाधित शेतकर्यांना मोबदला मिळावा या मागणीसाठी त्यांचे उपोषण सुरु आहे.उपोषणस्थळी प्रांताधिकारी देशमुख व तहसीलदार मदन जाधव यांनी भेट देवून आंदोलनकर्त्याशी चर्चा केली. मात्र त्यावर तोडगा न निघाल्याने ओदोलन आंदोलनावर ठाम होते.