चोरीच्या गुन्ह्यातील “या” किमतीचे सोने न्यायालयाच्या आदेशाने फिर्यादीस केले परत.....मंगळवेढा येथील प्रकार पोलीस निरीक्षक रणजीतसिंह माने यांच्या टीमनेकेली उत्कृष्ट कामगिरी
------------------------------------------------------------------------------------
मंगळवेढा( पंढरी नगरी न्यूज ) मंगळवेढा तालुक्यातील रड्डे येथे दोन वर्षापुर्वी घरफोडी करुन कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने चोरुन नेल्याप्रकरणातील आरोपी मोहन मच्छिंद्र चव्हाण व संतोष मच्छिंद्र चव्हाण या दोघा भावांकडून पोलीसांनी 1 लाख 10 हजार रुपये किंमतीचे 22 गॅ्रम सोने हस्तगत करुन न्यायालयाचे आदेशाने तो मुद्देमाल पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या हस्ते देताना मुळ फिर्यादी बाळासो कांबळे देण्यात आला.
मुळफिर्यादीस देण्यात आले.
या घटनेची हकीकत अशी, यातील फिर्यादी बाळासो राजेंद्र कांबळे (रा.रड्डे) हे दि.3 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 9 वाजता शेतात ऊसतोड आल्याने फिर्यादी,आई,चुलते व उत्तम कांबळे असे तिघे मिळून शिरनांदगी शिवारात राहते घराला कुलूप लावून शेतावर गेले होते. यातील चुलते उत्तम कांबळे दुपारी दोन वाजता जनावरांना पाणी पाजण्यासाठी घरी आले त्यावेळी घराच्या दरवाजाची कडी,कोयंडा व कुलूप तुटलेले व दरवाजा उघडा दिसला. त्यांनी घरात जावून पाहिले असता सोन्याचे दागिने ठेवलेल्या लोखंडी कपाटाचा दरवाजा उघडा दिसल्याने त्यांना खात्री पटली, अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने गायब केल्याचा गुन्हा दाखल होता. याचा तपास पोलीस हवालदार संजय जाधव यांच्याकडे होता. पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी या चोरीच्या तपासासाठी पोलीसांची टीम नेमून त्यांनी खबर्या मार्फत माहिती काढून ते जत भागात पोहचले. तेथून मोहन मच्छिंद्र चव्हाण, संतोष मच्छिंद्र चव्हाण या दोघा भावांना पोलीसांनी ताब्यात घेवून खाक्या दाखवताच त्यांनी चोरीची कबूली देवून मुद्देमाल 1 लाख 10 हजार रुपये किंमतीचे 22 ग्रॅम सोने पोलीसांनी जप्त केले. हा मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशाने मुळ फिर्यादी बाळासो कांबळे यांना दि.21 रोजी महालक्ष्मी आगमन दिवशी परत केला.