आमदार प्रणिती शिंदेनी घेतली प्रचारात आघाडी, विविध समाज घटकांचा मिळतोय पाठींबा पंढरपूर तालुक्यातील मतदाराकडून होते जोरदार स्वागत

आमदार प्रणिती शिंदेनी घेतली प्रचारात आघाडी, विविध समाज घटकांचा मिळतोय पाठींबा  पंढरपूर तालुक्यातील मतदाराकडून होते जोरदार स्वागत

------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज) शिंदे कुटुंबासाठी सोलापूर लोकसभा निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनली असून त्याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून आमदार प्रणिती शिंदे तर भारतीय जनता पार्टी कडून आमदार राम सातपुते अशी लढत होणार आहे.दोन्ही उमेदवारांनी वैयक्तिक गाठीभेटींवर भर देत प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारात सुसूत्रता दिसून येत आहे.

आमदार प्रणिती शिंदे यांना मिळतोय विविध घटक आणि समाजांचा पाठिंबा

सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी नियोजनबद्ध प्रचारात आघाडी घेतली आहे. काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे या दररोज समाजातील विविध घटकांची तसेच विविध समाजाच्या गाठीभेटी घेत आहेत. तसेच गावभेट दौरा व जनसंपर्क अभियान राबवत आहेत. त्यातून त्यांचा सूक्ष्म पातळीवर प्रचार सुरू आहे. लोकसभेच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील अनेक गावांना भेटी देत तेथील लोकांशी संपर्क साधला तसेच शहरी भागातील विविध सोसायट्या, मंडल यांना भेटी देण्याचा धडाका लावला आहे .

यावेळी नागरिकांच्या अडीअडचणी त्या समजून घेत आहेत. या समस्या कशा सोडवता येईल आणि भविष्यात गावांच्या विकासासाठी कसा प्रयत्न करता येईल, याबाबत चर्चाही त्या घटकांशी करत आहेत. यावेळी आपल्या कार्याने गावाची मान उंचावणाऱ्या विविध भगिणींच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यायलाही त्या विसरल्या नाहीत.

दुसरीकडे दररोज वेगवेगळ्या गावभेटी आणि जनसंपर्क अभियानादरम्यान त्या विविध धार्मिक स्थळांना देखील भेटी देताना दिसत आहेत. छत्रपती शिवरायांचे आशीर्वाद घेतले. त्यामुळे हिंदू बांधव, मुस्लिम समाज, ख्रिश्चन समाजाकडूनही त्यांना मोठा पाठींबा मिळताना दिसत आहे.

दररोज समाजातील विविध घटक आणि गावभेटींमधून आमदार प्रणिती शिंदे यांना मिळणारा पाठिंबा यामुळे त्यांचे पारडे दिवसेंदिवस जड होत चालले आहे. काल त्या मंगळवेढा तालुक्यातील दौरा आटोपून आज त्या दि. 7 रोजी पंढरपूर तालुक्यात सिद्धेवाडी, एकलासपूर ,अनवली कासेगाव ,तावशी ल.टाकळी, तनाळी, कोर्टी, बोहाळी, उंबरगाव, खर्डी, त. शेटफळ इत्यादी गावांना आज दिवसभर वैयक्तिक भेटी देण्यात आलेल्या गावात आमदार प्रणिती शिंदे यांचे ग्रामस्थाकडून जोरदार स्वागत करण्यात येत होते.