आमदार बबनदादा शिंदे ठरले बाजीगर, विठ्ठलराव शिंदे कारखान्यामार्फत ऊस तोडणी मजूरांना 34 टक्के वाढीचा फरक एकरक्कमी अदा- एकरक्कमी फरक देणारा राज्यातील एकमेव कारखाना- फरकाची 36 कोटी रक्कम बँकेत जमा - आ.बबनराव शिंदे

आमदार बबनदादा शिंदे ठरले बाजीगर, विठ्ठलराव शिंदे कारखान्यामार्फत ऊस तोडणी मजूरांना 34 टक्के वाढीचा फरक एकरक्कमी अदा- एकरक्कमी फरक देणारा राज्यातील एकमेव कारखाना-  फरकाची 36 कोटी रक्कम बँकेत जमा - आ.बबनराव शिंदे

-------------------------------------

माढा (दै. पंढरी नगरी न्यूज ) साखर संघ स्तरावर झालेल्या ऊस तोडणी व बैलगाडीने वहातूकीचे सुधारीत सामंजस्य करारानुसार ऊस तोडणी मजूरांना तोडणी दरामध्ये 34 टक्के वाढ करणेस मंजूरी दिलेनुसार विठ्ठलराव शिंदे कारखान्याने ऊस तोडणी मजूरांना ऊस गाळप हंगाम 2023-24 पासून तोडणी दर वाढ लागू करून फरकाची एकूण 36 कोटी 4 लाख रक्कम बँकेत जमा करणेत आली असल्याची माहीती संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे यांनी दिली.

अधिक माहीती देताना आ.शिंदे म्हणाले की, हंगाम 2020-21 ते 2022-23 या तीन गाळप हंगामाकरीता अस्तित्वात असलेला ऊस तोडणी व वाहतूक करणा-या शेतमजूरांच्या मजूरीच्या दराकरीता असलेला करार संपल्यामुळे सन 2023-24 पासून शेतमजूरांच्या दरामध्ये वाढ करून नवीन करार करण्यासंबंधी ऊस तोडणी/शेत मजूरांच्या संघटनांनी महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ लि.मुंबई यांचे स्तरावर प्रस्ताव सादर केले होते. त्यानुसार साखरसंघ स्तरावर दि.4 जानेवारी, 2024 रोजी संघटना प्रतिनिधी व कारखाना प्रतिनिधी यांचेमध्ये बैठक होवून हंगाम 2023- 24 ते 2025- 26 या तीन हंगामाकरीता डोकी सेंटर, गाडी सेंटर व टायरगाडीचे ऊस तोडणी दरामध्ये 34 टक्के वाढ व मुकादम कमिशनमध्ये 1 टक्का वाढ करून 20 टक्के करणेस मंजूरी देण्यात आली आहे. हा वाढीचा करार हंगाम 2023- 24 ते 2025-26 या तीन हंगामाकरीता लागू असणार आहे. तोडणी दराचे 34 टक्के वाढीमुळे बैलगाडी/ युवराज साठी सुधारीत दर रू.381.84, डोकीसेंटर,ट्रक,ट्रॅक्टर रू.439.21 व गाडी सेंटर रू.490.09 असा सुधारीत दर होत आहे. या वाढीमुळे अंदाजे 36 कोटी रूपयांचा अतिरिक्त बोजा कारखान्यावर पडला आहे.

सन 2023- 24 मध्ये युनिट नं.1 पिंपळनेर व युनिट नं.2 करकंब साठी तोड वाहतूक केलेल्या ऊस तोडणी मजूरांना ही दरवाढ लागू करून त्यानुसार तोडणी वाहतूक बिले तयार करण्यात आली आहेत. या वाढीव दरानुसार तोडणी वाहतूक बिले तयार करून वाढीच्या फरकाची एकूण 36 कोटी 4 लाख रक्कम बँकेत जमा करणेत आली आहे. 34 टक्केवाढीचा फरक देणारा विठ्ठलराव शिंदे राज्यातील एकमेव कारखाना ठरला आहे. कारखान्याचा गाळप हंगाम यशस्वीरित्या पार पडणेसाठी ऊस तोडणी मजूर,मुकादम,वाहनमालक यांचा सहभाग मोठा आहे. पुढील सन 2024 - 25 गाळप हंगामामध्ये दोन्ही युनिटकडे गाळपक्षतमेनुसार ऊस पुरवठा होणेसाठी ऊस तोडणी वाहतूकीचे करार सुरू करण्यात आले असून त्यांना कारखाना धोरणानुसार ॲडव्हान्स वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतक-यांना दिलासा देणेच्या दृष्टीने कारखान्याने दोन्ही युनिटकडे ऊस गाळप हंगाम 2023-24 मध्ये कपात केलेली जळीत ऊसाची एकूण 3 कोटी 91 लाख रक्कम संबंधित ऊस पुरवठादार शेतक-यांना परत करण्यात आली आहे. ऊस गाळप हंगाम 2023-24 मध्ये दोन्ही युनिट कडे गळीतास आलेल्या ऊसाची अनुदानासह संपूर्ण ऊस बिले व तोडणी वाहतूक बिले अदा करण्यात आली आहेत. पुढील सन 2024-25 गळीत हंगाम यशस्वीरित्या पार पाडणेसाठी सभासद शेतक-यांनी जास्तीत जास्त ऊस नोंदी कारखान्याकडे द्यावेत असे आवाहन आ.शिंदे यांनी केले.

सदरप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन वामनराव उबाळे,कार्यकारी संचालक व इतर खातेप्रमुख उपस्थित होते.