नवोदय विद्यालयात श्रीराम नवमी उत्साहात साजरी..
---------------------------------------------------------------------------------
तुळजापूर (दै.पंढरी नगरी न्यूज ) : जवाहर नवोदय विद्यालयात गुरुवार दिनांक ३०/०३/२३ रोजी श्रीराम नवमी कार्यक्रम उत्साहात पार पडला. सर्वप्रथम विद्यालयाचे प्राचार्य श्री गंगाराम सिंह व विद्यार्थी यांच्या हस्ते श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर संगीत अध्यापक श्री पी .एन .जोशी सर व त्यांचे शिष्य यांच्याद्वारे तूही माता तूही पिता हे सुरेल भक्ती गीत गायन करून संपूर्ण वातावरण भक्तीमय केले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य श्री गंगाराम सिंह म्हणाले की, भारतभूमी ही पवित्र भूमी आहे या पवित्र भूमीमध्ये अन्याय अत्याचार नष्ट करण्यासाठी या भूमीवर अनेक महापुरुषांचा जन्म झाला. अशा महापुरुषांपैकी एक श्रीराम होते. त्यांच्या जीवनातील वेगवेगळे प्रसंग सांगून श्रीरामाच्या अंगी बंधुप्रेम, मात्यापित्याविषयी आदर, एक वचनी, सत्यवचनी, मर्यादा पुरुषोत्तम, आदर्श राजा कसे होते हे सांगून त्यांच्या गुणाचे स्मरण करावे व त्यांचे गुण आचरणात आणण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हरी जाधव यांनी केले.
या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी ,शिक्षक वृंद उपस्थित होता.