पंढरपूर तहसीलदार कार्यालयातील खाजगी इसम 1000 हजाराच्या लाच प्रकरणी अँटी करप्शन च्या जाळ्यात, महसूल विभागात उडाली एकच खळबळ, आवारात दिवसभर चर्चा
------------------------------------------------------------------------------------
पंढरपूर ( पंढरी नगरी न्युज ) पंढरपूर तहसीलदार कार्यालयात जेलर विभागात काम करीत असलेले खासगी इसमास लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाच घेताना रंगेहात पकडले .यामध्ये पंढरपूर तहसीलदार कार्यालयामध्ये खळबळ उडाली आहे. पंढरपूर तहसीलदार कार्यालयातील खाजगी इसम भागवत बागल हा तहसील कार्यालयात जेलर विभागात खाजगी कारकून म्हणून काम पाहत होता .पोलिसात दाखल झालेल्या अदखलपात्र गुन्ह्यात मदत करण्यासाठी तडजोड म्हणून एक हजार रुपयाची लाच घेताना भागवत जनार्दन बागल रा. गादेगाव ता. पंढरपूर यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवार दिनांक 26 रोजी दुपारी तहसील कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. फिर्यादीवर अदखलपत्र गुन्हा दाखल झाला होता .यामध्ये जामीन घेण्यास मदत करण्यासाठी भागवत बागल यांनी एक हजार रुपये याची मागणी केली होती. या मागणीच्या विरोधात काही दिवसापूर्वी फिर्यादीने लाच लुचपत विभागाकडे संबंधित विषयाची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची खातरजमा करून लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून अखेर मंगळवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे तहसील मधील कर्मचाऱ्यांमध्ये या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.
ही कारवाई करण्यासाठी पोलीस अधीक्षक लाचलुचपत विभाग पुणे येथील श्री .अमोल तांबे ,डॉ. शीतल जानवे /खराडे, अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत विभाग पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर विभागाचे पोलीस उप अधीक्षक गणेश कुंभार यांनी दमदार कामगिरी केली आहे.
------------------------------------------------------------------------------------
तहसील मधील खाजगी इसमास बळीचा बकरा दिल्याची चर्चा
------------------------------------------------------------------------------------
या संपूर्ण प्रकरणातील बडा मासा बाजूलाच राहिल्याची चर्चा नागरिकांतून दिवसभर होत होती. या कारवाई प्रकरणावर संशय व्यक्त होत असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.