राज्यातील महादेव ,मल्हार ,टोकरे ,ढोर कोळी समाज सत्ताधाऱ्याच्या विरोधात उतरणार :- शरद कोळी,
-----------------------------------------------------------------------------------
सोलापूर (पंढरी नगरी न्यूज ) २४ गेली अनेक वर्ष राज्यातील अन्यायग्रस्त महादेव मल्हार टोकरे ढोर कोळी जमात आपल्या जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्रासाठी झगडत आहे परंतु आज पर्यंतच्या सर्व शासनकर्त्यांनी कोळी जमातीचा प्रश्न सोडवला नाही त्यामुळे समाजात प्रचंड असंतोष पसरला असून आगामी काळात लोकशाही पद्धतीने हा समाज सत्ताधार्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरणार असल्याचे शरद कोळी यांनी सांगितले आहे.
2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात एक कोटी पाच लाख आदिवासींची संख्या नोंदली गेली आहे अनुसूचित क्षेत्रामध्ये 43 लाख लोक राहतात तर विस्तारित क्षेत्रात 61 लाख आदिवासी जमाती राहतात ही लोकसंख्या गृहीत धरून 9.35% महाराष्ट्राच्या एक कोटी पाच लाख लोकसंख्येच्या विकासासाठी 25 आमदार आणि चार खासदार दिलेले आहेत परंतु हेच 25 आमदार आणि चार खासदार विस्तारित क्षेत्रातील महादेव मल्हार टोकरे ढोर कोळी जमातीला आरक्षण मिळू देत नसल्यामुळे आणि सत्ताधार्यावरती सर्वपक्षी आमदार दबाव टाकत असल्यामुळे अजून पर्यंत न्याय मिळालेला नाही लोकसंख्या गृहीत धरून जर राजकीय आरक्षण घेत असाल तर ती लोकसंख्या सुद्धा खरीच आहे .खऱ्या लोकसंख्येला बोगसमन्य हे असं संविधानिक आहे राज्य शासनाने आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी विचारलेल्या लक्षवेधी प्रश्नाला उत्तर देताना नीलम ताई गोरे यांनी कोळी जमातीच्या प्रश्नासाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ बैठक घेऊ असे आश्वासन नागपूर हिवाळी अधिवेशनात दिले होते परंतु अद्याप पर्यंत ही मंत्री मंडळ बैठक घेतलेली नाही सभागृहाला दिलेले वचन सुद्धा हे सरकार पळत नाही त्या सरकारचा मी जाहीर निषेध करतो तसेच आता तरी किमान समाजाचे लोकप्रतिनिधी अभ्यासक यांची स्वतंत्र मंत्रिमंडळ बैठक घेऊन समाजाचा प्रश्न कायमचा सोडवावा अन्यथा सत्ताधाऱ्यांना सत्तेतून खाली खेचल्याशिवाय गप्प बसणार नाही असे शरद कोळी यांनी ठणकावून सांगितले आहे.
यावेळी शरद कोळी ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भीमाशंकर जमादार ,नागेश बिराजदार ,उद्योजक गणेश कोळी, ज्येष्ठ अभ्यासक बाळासाहेब बळवंतराव, वाल्मिकी संघाचे जिल्हाध्यक्ष गणेश अंकुशराव, ज्येष्ठ नेते दादा करकमकर ,नगरसेवक सुरेश नेहतराव, माजी नगरसेवक गणेश भाऊ आधटराव, संतोष पाटील, अरुण लोणारी ,भारतीताई कोळी ,सुभाष अधटराव ,सुदाम होमकुमडे ,लक्ष्मण जमादार ,नागेश कोळी, योगी निंबाळे, दत्ता छत्रे.इ. जिल्ह्यातील महादेव कोळी समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.