वसंतराव काळे कारखान्याच्या निवडणुकीसाठी पहिल्या दिवशी २० उमेदवाराचे अर्ज दाखल..
---------------------------------------------------------------------------------
पंढरपूर (पंढरी नगरी न्यूज ) सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना, लि.चंद्रभागानगर, भाळवणीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक जाहिर झाली आहे. अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी १८६ अर्जांची विक्री झाली असून २० उमेदवारांनी २० उमेदवारीचे अर्ज दाखल झाले असल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी भारत वाघमारे यांनी दिली आहे.
सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लि.चंद्रभागानगर, पो.भाळवणी, (ता.पंढरपूर) या सहकारी साखर कारखान्यानी संचालक मंडळींनी निवडणूक २०२३-२४ ते २०२८-२९ हा कार्यक्रम जाहिर झाला आहे. २१ संचालक निवडीसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला आहे. कारखान्यासाठी ५ गटातुन मतदान होणार आहे. भाळवणी, भंडीशेगाव, गादेगाव, कासेगाव, सरकोली या पाच गटातून तर उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक सहकारी संस्था व पणन संस्था प्रतिनिधी, अनुसुचित जाती किंवा जमाती प्रतिनिधी, महिला राखीव प्रति निधी इतर मागासवर्ग प्रितनिधी, भटक्या विमुक्त जाती व जमाती, विशेष मागास प्रवर्गाचा प्रतिनिधी हे उमेदवार प्रत्यक्ष मतदानाद्वारे निवडले जाणार आहेत. १६ जून २०२३ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी५ यावेळेत मतदान होणार आहे.