वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचा दि. १४ रोजी मोळी पूजनाचा शुभारंभ

वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचा दि. १४ रोजी  मोळी पूजनाचा शुभारंभ

----------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (प्रतिनिधी) : चंद्रभागानगर भाळवणी, येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचा सण २०२२-२३ या सिझनचा २३ वा. गळीत हंगाम शुभारंभ शुक्रवार दिनांक १४ रोजी गव्हाणीत मोळी टाकून ऊस गळिताचा शुभारंभ करणार असल्याची माहिती सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी दिली.

यावेळी सकाळी ११. वाजता कारखान्याच्या ज्येष्ठ संचालिका मालनबाई काळे तसेच यशवंतराव चव्हाण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित गुरसाळे, चेअरमन शहाजी साळुंखे .प्रतिभादेवी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन विष्णू येलमार कारखान्याचे व्हाईस चेअरमन राजेंद्र शिंदे .निशिगंधा सहकारी बँकेचे व्हॉइस चेअरमन आर्. बी. जाधव यांच्या शुभहस्ते मोळी चे पूजन करून गव्हाणीत मोळी टाकण्याचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत तुकाराम महाराजांचे वंशज ह .भ. प .बापूसाहेब मोरे महाराज (देहूकर ) व वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून कारखान्यातील गव्हाण व काटा पूजन कारखान्याचे संचालक सुधाकर कवडे व त्यांच्या सुविद्म पत्नी जयश्री कवडे या उभयतांच्या शुभहस्ते सकाळी ९:०० वा.कारखाना कार्यस्थळावर होणार आहे.

तरी तालुक्यातील व कारखाना पंचक्रोशीतील शेतकरी, सभासद, वाहन मालक ,चालक यांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन कारखान्याचे कार्यकारी संचालक झुंजार आसबे यांनी केले .