तुळजापूर येथील नवोदय विद्यालयात बालदिन उत्साहात साजरा..
------------------------------------------------------------------------------------
तुळजापूर (दै पंढरी नगरी न्यूज ) : जवाहर नवोदय विद्यालयात स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान, भारतरत्न , शांतिदूत, चाचाजी यांचा जन्मदिन १४ नोव्हेंबर हा बाल दिवस म्हणून आज सोमवार दिनांक १४/११/२०२२ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सर्वप्रथम विद्यालयाचे प्राचार्य श्री गंगाराम सिंह यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी व्यासपीठावरती विद्यालयाचे उपप्राचार्य श्री. एस व्ही .स्वामी उपस्थित होते. विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक वृंद ,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कु.स्नेहा कवडे विद्यार्थिनीने पंडित नेहरूंच्या कार्याची ओळख करून दिली . विद्यालयाचे प्राचार्य श्री गंगाराम सिंह यांनी विद्यार्थ्यांना बाल दिवसाच्या शुभेच्छा देऊन पंडित नेहरू हे कसे प्रखर देशप्रेमी ,लोकशाही विचारांचे समर्थक , कायदे पंडित हे सांगून मुले व फुले त्यांना का आवडत होती हे सांगून विद्यार्थ्यांना आपल्या वरती असणारी जबाबदारी पूर्ण करण्याचे आवाहन केले. यावेळी विद्यालयातील सहावी ते बारावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना लेखणी (पेन) व चॉकलेट भेट देऊन सर्व विद्यार्थ्यांना बाल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एच.जी. जाधव यांनी केले.