दिव्यांग बांधवांसाठी शासनाने केली स्वतंत्र कल्याण मंत्रालयाची स्थापना..

दिव्यांग बांधवांसाठी शासनाने केली स्वतंत्र कल्याण मंत्रालयाची स्थापना..

-------------------------------------------------------------------------------------

राज्यातील दिव्यांगाने मानले शिंदे - फडणवीस ,शासनाचे आभार सर्वत्र उत्साहाचे वातावरण...
-------------------------------------------------------------------------------------

पंढरपूर – (दै .पंढरी नगरी नगरी न्यूज) : दि. ११/ ११/ २०२२ रोजी अखंड भारत देशामध्ये आतापर्यंत असा कुठलाही निर्णय झाला नाही असा निर्णय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या अथक प्रयत्नामुळे महाराष्ट्र शासनाने दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण मंत्रालयाची निर्मिती केली आहे.

त्याचा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी सोलापूर जिल्हा प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्यावतीने सोलापूर जिल्ह्यातील तमाम दिव्यांग बांधवांनी पंढरपूर तालुक्यामध्ये बच्चुभाऊंच्या आदेशानुसार बुंदीचे लाडू वाटून,पेढे वाटून आनंद व्यक्त करत असताना सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रा.सुभाष माने सर यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जी भारत देशाला घटना दिली त्या घटनेच्या आधारावरती आज या दिनदुबळ्या दिव्यांग बांधवांना महाराष्ट्र शासनाने न्याय दिला आहे.

यावेळी प्रा.सुभाष माने सर, प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ चौगुले, जिल्हा सचिव संजय जगताप,पंढरपूर तालुका अध्यक्ष उमेश गोडसे, दत्ता जमदाडे, पंढरपूर शहर अध्यक्ष गणेश ननवरे, शहर महिला अध्यक्ष सुनीता लवंड, ज्ञानेश्वर गायकवाड, संतोष पवार, राहुल सुतार, अरविंद मोरे, हनुमंत आटकळे, हनुमंत चव्हाण व पंढरपूर तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधव उपस्थित होते.