आई - वडील यांचे आशीर्वाद बरोबर असतील तर माणूस नक्कीच यशस्वी होतो- प्रा. शिवराज मोटेगावकर

आई - वडील यांचे आशीर्वाद बरोबर असतील तर माणूस नक्कीच यशस्वी होतो- प्रा. शिवराज मोटेगावकर

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

गादेगांव ( पंढरी- नगरी न्यूज ) पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथे शिवराज.मोटेगावकर पब्लिक स्कूल व  शिवरत्न पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज गादेगाव या संस्थेच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन समारंभ वेळी प्राध्यापक शिवराज मोटेगावकर  यांनी आपले विचार व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी आपल्या आई-वडिलांची काळजी घेणे आपल्या आई-वडिलांचा संभाळ करणे हे सध्याच्या काळामध्ये अत्यंत गरजेचे आहे .आई वडील हे आपले प्रथम दैवत व गुरुवर्य हे दुसरे दैवत हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे असे मोटेगावकर सर यांनी गादेगाव येथील भूमिपूजन समारंभ मोटेगावकर यांनी शिवराज मोटेगावकर  पब्लिक स्कूल व शिवरत्न पब्लिक स्कूल गादेगाव सदर संस्था आम्ही दत्तक घेत असून भविष्यामध्ये तुमच्या विद्यार्थ्याला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही याची हमी यावेळी त्यांनी दिली. तुम्ही दिलेला पोटचा गोळा आम्ही नक्कीच तुम्हाला हवा तसा घडवू असे आश्वासन यावेळी प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांनी दिले.

विद्यार्थी दशे पासून स्वतःचा जीवनपट विद्यार्थ्यांसमोर मांडला यावेळी त्यांनी आपण कसे घडलो कसा संघर्ष केला याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांनी आपली जबाबदारी ओळखून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला शिक्षणाचा अधिकार याचा पुरेपूर लाभ घेतला पाहिजे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टींमध्ये लक्ष देऊ नये. मी स्वतः विद्यार्थ्यांना दैवत म्हणून काम करत असतो असे यावेळी त्यांनी सांगितले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनश्री समूहाचे प्राध्यापक शिवाजीराव काळुंगे सर हे होते. प्रमुख उपस्थितीमध्ये आरसीसी क्लासेस लातूरचे शिवराज मोटेगावकर,  कार्यकारी अभियंता धनंजय गोडसे, विधी तज्ञ विजय जाधव, वक्ते माऊली जाधव, सरपंच दिपाली बागल, उपसरपंच लता हुंडेकरी, राष्ट्रवादीचे हनुमंत पवार, उद्योगपती पद्माकर बागल, तंटामुक्ती अध्यक्ष सूर्यकांत  बागल, बिल्डर दत्ता बागल, भाजपचे गणेश बागल, बाजीराव बागल, अरुण नारायण बागल, सुभाष बागल, मोहन बागल, समाधान फाटे, डॉ. रमेश पाटील, संजय  बागल, अनिल  बागल, स्वरा उद्योगचे विजय जाधव, हनुमंत नागणे, गणेश मेडिकल, जितू फाटे, हरिदास बागल, सिद्धनाथ बागल, गोरख बागल, सिताराम  बागल, दीपक बागल, भगवान( महाराज) बागल, विनोद कदम, डॉक्टर दत्तात्रय साळुंखे, गणपत बागल, शांतिनाथ शिंदे सर, नितीन बागल, अरविंद बागल, गणेश चव्हाण, श्रीधर यलमार, कृष्णा पाटील, अनिल कंडरे, पक्का यलमार, तानाजी गोपणे, मधुकर कदम, बाबा हाके, नितीन मोरे, अमोल मोरे, प्रवीण मोरे, सहशिक्षक  राजेंद्र भोसले, सोमनाथ भूईटे,  नियाज मुलाणी, शितल बागल, वर्षा मोरे, संतोष पवार, शितल मस्के, अजय मोरे आदी उपस्थित होते.

यावेळी माऊली जाधव यांनी आपले विचार व्यक्त केले संस्थापक अध्यक्ष गणपत मोरे यांनी प्रास्ताविक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक देशमुख यांनी केले व आभार नागेश कांबळे यांनी मानले.