सिध्देवाडी येथील जाधव - नागणे जि.प. प्राथमिक वस्ती शाळेला स्वच्छ : शाळा सुंदर - शाळा पुरस्कार प्रदान..

सिध्देवाडी येथील जाधव - नागणे जि.प. प्राथमिक वस्ती शाळेला स्वच्छ : शाळा सुंदर - शाळा पुरस्कार प्रदान..

***************************************************

पंढरपूर( प्रतिनिधी ):- भारत सरकार मान्यता प्राप्त असलेल्या राष्ट्रीय विश्वगानी पत्रकार संघ संचलित राष्ट्रीय विश्वगामी शिक्षक व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र प्रदेश यांच्यावतीने राज्यस्तरीय स्वच्छ शाळा - सुंदर - शाळा हा पुरस्कार जिल्हा प्राथमिक केंद्र शाळा सिद्धेवाडी येथील जाधव - नागणे वस्ती शाळेला प्रदान करण्यात आला आहे. विश्वगामी बहुउद्देशीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय संतोष निकम यांच्या हस्ते आणि राज्य अध्यक्ष बापूसाहेब आडसूळ यांच्या उपस्थितीत हा सोहळा सोलापूर येथील हरीभाई देवकन प्रशाला येथे नुकताच पार पडला शाळेचा निसर्ग मी परिसर स्वच्छता आणि भौतिक सुविधा या आदरवर हा पुरस्कार शाळेला प्रदान करण्यात आला आहे असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक आदर्श शिक्षक एम.बी. जाधव यांनी सांगितले.

यावेळी कार्यक्रमास जाधव -  नागणे वस्ती शाळेचे मुख्याध्यापक एम. बी. जाधव गुरुजी, तेजस्विनी कांबळे, घोडके मॅडम यांनी हा पुरस्कार स्वीकारला .

यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष नागनाथ क्षीरसागर, चंद्रदीपक भालेकर गुरुजी, आनंद भोपळे गुरुजी विठ्ठल शिखरे गुरुजी,अविनाश कदम विजय बागल, देवळे गुरुजी, आसबे गुरुजी, पिंटू शिंदे, अण्णा माने. देशमुख गुरुजी,  संजय घोडके सर , उपस्थित होते, जाधव -  नागणे या वस्ती शाळेला पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा सिद्धेवाडी येथील ग्रामस्थांनी मुख्याध्यापक व शिक्षक स्टाफ यांचे अभिनंदन करून शुभेच्छा देण्यात आल्या.