आमदार. समाधान आवताडे इफ्तार पार्टीत सहभागी

आमदार. समाधान आवताडे  इफ्तार पार्टीत सहभागी

-----------------------------------------------------------------------------------
सर्व मुस्लिम बांधवांना दिल्या शुभेच्छा, बांधवामध्ये उत्साहाचे वातावरण
-----------------------------------------------------------------------------------

पंढरपूर (दै.पंढरी नगरी न्यूज) कराड नाका स्टेशन मस्जिद येथे आमदार समाधान दादा अवताडे यांच्या उपस्थितीत इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

पंढरपूर शहरातील मुस्लिम समाजाचे रमजान महिना हा पवित्र आणि मंगल समजला जातो. रमजान महिन्यामध्ये सर्व मुस्लिम बांधव गुण्यागोविंदाने रमजान महिन्यांमध्ये उपवास करतात तसेच दानधर्म जकात करत मुस्लिम समाजामध्ये सर्व धर्मीय समभावाची रमजान महिन्यांमध्ये संदेश देतात. त्याप्रसंगी रमजान महिना निमित्त स्टेशन मस्जिद येथे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा.समाधानदादा आवताडे यांनी इफ्तार पार्टीमध्ये सहभाग घेऊन मुस्लिम समाजाला शुभेच्छा दिल्या.

यावेळी ऍड यासीन शेख, अमीन शेख, सलीम गवंडी, लखन थिटे, प्रसाद भैय्या कळसे, महम्मद मुलाणी, युसुफ मुजावर, मुजिफ मांजुले , राजू मुलानी सर रफिक नदाफ, शमसुद्दिन मंजुले,अबिद बेलगवकर, जविद शेख, जकिर शेख, अमीर खान, भास्कर जगताप, संतोष डोंगरे, यांच्यासह मुस्लिम बांधव उपस्थित होते.